पिंप्रीत डेरेदार लिंब वृक्ष तोडले..! परवानगी न घेता वृक्षांची कत्तल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी..!

✒️पी.डी.पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.8जून):-पिंप्री खु ता धरणगाव येथे श्रीराम मंदिर परिसरात असलेले चौधरी मेडिकल च्या जवळ लिंब या डेरेदार वृक्ष चे दि 8 जुन रोजी कत्तल होताना पिंप्री येथील काही निसर्ग प्रेमी यांच्या निदर्शनास आले. घडलेल्या प्रसंग ने अतिशय चुकीचा संदेश जात असुन निसर्गाच्या हानी कारणाऱ्यावर कारवाई होईल का ? वृक्ष तोडण्याची रीतसर परवानगी घेतली का ? अशी मागणी येथील निसर्ग प्रेमी गोकुळ चित्ते सर यांनी केली तसेच घडलेल्या घटने बाबत ग्रामविकास अधिकारी श्री बोरसे यांना तात्काळ कळवले. घटना नेमकी काय आहे हे तात्काळ माहिती घेतो असे श्री बोरसे यांनी संगितले

आज कोविड कालावधी मध्ये लोकांना ऑक्सिजन साठी काय हाल झाले हे आपण पाहिलं आता निसर्ग निर्मित ऑक्सिजन वर हल्ला होत असताना वृक्ष कत्तल करणे हे निंदनिय आहे . संबंधितावर कारवाई व्हावी.

निसर्ग प्रेमी – गोकुळ चित्ते सर

पर्यावरण, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED