मंजू ठाकरे `जिजाऊरत्न’ पुरस्काराने सन्मानित

57

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.8जून):-महाराष्ट्र `जिजाऊ ब्रिगेड’च्या वतीने पिंपळनेर येथे ४ आणि ५ जून रोजी राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटविणाऱ्या मंजू ठाकरे यांना `जिजाऊरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

`मराठा सेवा संघ’प्रणित `जिजाऊ ब्रिगेड’द्वारा आयोजित पहिले राष्ट्रीय ग्रामीण महाअधिवेशन ४ व ५ जून रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे उत्साहात संपन्न झाले. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्या अनुषंगाने एक गृहिणी असतानासुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात आपला उल्लेखनीय ठसा उमटविणाऱ्या आणि महाराष्ट्राची लावणी ही लोककला राज्यातील विविध भागांत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमरावतीची लेक मंजू संजय ठाकरे यांचा `जिजाऊरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याला अधिवेशनाच्या प्रथम सत्राच्या उद्घाटक मनकर्णाबाई मराठे, जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय समन्वयक मयुराताई देशमुख, मराठा सेवा संघाचे इंजि.चंद्रशेखर शिखरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, महासचिव प्रा.स्नेहा खेडेकर, कोषाध्यक्ष कांचनताई उल्हे, प्रदेश सदस्या सत्यभामाताई खेडेकर, सुप्रसिद्ध व्याख्याता आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या क्षिप्रा मानकर, अंजली भोसले, डॉ.विद्या भांबरे, नुतन पाटील, भारती भदाणे, आरती बोंदरकर, सुजाता चव्हाण, अश्विनी भांबरे, सोनाली भदाणे, मंजुळा पाटील, भारती अहिरे आदी उपस्थित होत्या.