माढा तालुक्यातील रासायनिक खतांचा कृतिम तुटवडा करून शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी: प्रहार जिल्हा समन्वयक पंडित साळुंके

35

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.8जून):-माढा तालुक्यातील रासायनिक खतांचा कृतिम तुटवडा करून शेतकऱ्यांना ज्यादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन दिले अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा व त्याबाबत तालुका कृषी कार्यालय यांचे सोबत चर्चा करत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. जे दुकानदार शेतकऱ्यांना गरज नसलेले खत देत असतील तर त्यांच्यावर कारवाई चे आश्वासन दिले आहे. तसेच तालुक्यातील सर्व खत दुकानांची तपासणी केली. असल्याचे आणि अजूनही तपासणी करण्याचे लेखी आश्वासन तालुका कृषी अधिकारी यांनी दिले आहे. लिंकिंग द्वारे खतांची विक्री न करता शेतकऱ्यांना गरजेचे जे खत आहे. ते देण्यात यावे याबाबत दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत .

अजूनही सूचना देऊ आणि ज्यांच्या वर अन्याय झाल्यास अशा शेतकऱ्यांनी हेल्प लाईन न 180023340000 वरती कॉल करून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे 7 जुन चे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनीं प्रहार शेतकरी संघटनेचे पदधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्या प्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, युवा तालुका संपर्क प्रमुख सुयोग कदम,संतोष कवले, विजय जगताप, लक्ष्मण वरपे आदी पदाधिकारी कृषीचे कृषी अधिकारी कदम साहेब, अनिल काका देशमुख साहेब, काकडे साहेब, तसेच पोलिस बंधोबस्त ही उपस्थित होता.*