कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र राज्य आणि श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज यांच्या वतीने कोरोना संसर्गामुळे एकल झालेल्या महिलांना शेळी वाटप

41

✒️नवनाथ पौळ(विशेष प्रतिनिधी)

केज(दि.8जून):- कोरोना संसर्गामुळे एकल झालेल्या महिलांना कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती , महाराष्ट्र राज्य आणि श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज यांच्या प्रयत्नातून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ज्ञ आदरणीय हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील एक सुहृद व्यक्तीमत्व यांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई गोखले यांच्या तळमळीने केज तालुक्यातील चौदा कोरोना संसर्गामुळे एकल झालेल्या महिलांना प्रत्येकी एक शेळी या प्रमाणे चौदा शेळ्यांचे आज मौजे जोला ता केज येथे मिशन वात्सल्य समिती च्या सदस्य सचिव तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शोभाताई लटपटे यांच्या उपस्थितीत व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ थळकरी साहेब व देवकते साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

आज बुधवार दिनांक 08 जून 2022 रोजी मौजे जोला येथे जोला गावाच्या सरपंच सुभाबाई ढाकणे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शोभाताई लटपटे, महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी लहु राऊत, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ थळकरी साहेब, डॉ देवकते साहेब, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा केज तालुका मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य बाजीराव ढाकणे , डॉ बी.आर.ओव्हाळ मॅडम, अंगणवाडी पर्यवेक्षिका मुंडे मॅडम, न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी चे विमा प्रतिनिधी पवार, श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज च्या अध्यक्षा रुक्मिणीबाई ढाकणे सचिव आशाताई ढाकणे, मिराबाई ढाकणे, महेश ढाकणे, गोविंद ढाकणे, अक्षय ढाकणे ,सुनिता केदार, पल्लवी मुंडे, सविता सारुक यांच्या हस्ते शेळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ थळकरी साहेब यांनी लाभार्थी महिलांसोबत चर्चा करतांना शेळीच्या आरोग्य बाबतीत सविस्तर माहिती दिली आणि उदारनिर्वाहासाठी शेळी कशी फायद्याची आहे हे लक्षात आणून दिले. लटपटे मॅडम यांनी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच ‘ मदत म्हणून दिलेल्या शेळ्या न् विकता त्यांची जोपासना करून स्वतःचे उत्पन्न वाढवावे .’ असे मार्गदर्शन केले. तसेच एकल महिलांसाठी श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला यांच्या सतत सुरू असलेल्या कार्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.त्यानंतर सर्व कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांना शेळी वाटप करण्यात आले यामध्ये शोभा रामचंद्र आगे, सुरेखा अनिल आगे ,आशाबाई शिवाजी मुंडे,आशाबाई विक्रम ढाकणे,इंदुबाई उध्दव मुंडे, सिमा नेताजी थोरात , सोनाली केंद्रे, अनिता देशमुख ,पुनम राजेंद्र डोरले, सिंधुबाई दिलीप पारवे, सुरेखा बालासाहेब ससाणे , संगिता मधुकर ससाणे , कावेरी ससाणे, उर्मिला चाळक या महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद ढाकणे, महेश ढाकणे व अक्षय ढाकणे इत्यादींनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य चे बीड जिल्हा समन्वयक तथा केज तालुका मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य बाजीराव ढाकणे यांनी केले.