सुदृढ राष्ट्र निर्मीती,समाज स्वास्थ्यासाठी तणाव मुक्त युवा पिढीची गरज-प्रा.शरद शेजवळ

30

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.8जून):-आज २१ व्या शतकाशी स्पर्धा करताना आज युवकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे या संघर्षतून तो जीवनमूल्ये जपत यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. अलीकडच्या काळात जनजीवन हे तणावाने भरले असले तरी व्यक्ती,समाज,राष्ट्र सुदृढ निर्माण होण्यासाठी तणाव मुक्त युवा पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. असे मत प्रा.शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.कर्मवीर गणपतदादा मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निफाड येथे डॉ एम.आर.जयकर व्याख्यान मालेत कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयात दिनांक 28 मे ते 1 जून 2022 या कालावधीत ही व्याख्यान माला आयोजित केली गेली आहे.यात अनेक तज्ञांची व्याख्यान आयोजि त केली आहे. या व्याख्यान माळेचे पहिले पुष्प प्रा. शरद शेजवळ यांनी गुंफले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर. एन.भवरे हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.बी.सी आहेर यांनी केले.

आधुनिक युगात व्यक्ती आणि समाजाने प्रत्येक क्षेत्रात काम कार्य गतीचा प्रचंड वेग धारण केला असून तो काही का प्रसंगी जीव घेणार आणि व्यक्ती व समाज स्वास्थ्य बिघडवणारा ठरत आहे आदर्श व्यक्तिमत्व व सुदृढ समाजासाठी तनाव मुक्त व्यक्ती व समाज व्यवस्था अस्तित्वात येणे व्यक्ती व राष्ट्रासाठी आवश्यक असून समाजातील विविध कला कथा संगीत हे तणाव मुक्त समाज व्यवस्थेसाठी आवश्यक आहे नव्या पिढीला तनाव मुक्त ठेवण्यासाठी आणि आणि समाज स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी मानवी मेंदू मन मनगटाला नियमित सकस प्रबोधनाची गरज असून भारतीय संविधानाला अपेक्षित लोकशाही समता स्वातंत्र्य न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टीकोन समाजवादी समाजरचना राष्ट्रीय एकता व एकात्मता युवा व समाज मनात रुजवणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन यावे

आणि शेजवळ यांनी केले कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची विचार अधूरा प्रत्यक्षात आपल्या आचरणात आणली सन 18 73 साली सत्यशोधकी जलशा यांची झालेली सुरुवात व पुढे सत्यशोधकी साहित्य कलाविष्कार नियतकालिके प्रबोधन पर कीर्तने प्रवचने त्यायोगे लोकशिक्षण प्रचार-प्रसार अशा रचनात्मक कामाची पायाभरणी झाल्याचे नमूद करून विषमतावादी समाजामध्ये समतेची मूल्य आणि संत साहित्याने दिलेली अभंग कला व त्या कलेतील टाळ-मृदुंग चिपळ्या टाळ आदी वाद्य मानवी मन प्रबोधित करण्यासाठी सांगीतिक पद्धतीनेच तणावमुक्त समाजाची पायाभरणी करत होती असे प्रा शरद शेजवळ म्हणाले महात्मा फुले यांनी 1853 मध्ये निर्मिका चा शोध 18 54 मध्ये मनुस्मृतीचा धिक्कार 18 55 मध्ये तृतीय रत्न ना मग नाटक 1855 मध्ये पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावून त्यांच्यावर पहिला दीर्घ पोवाडा लिहून समाजाला सत्यशोधकी कला-संगीत आत्मक सांस्कृतिक शाहिरी जलसा ची पायाभरणी करून तनाव मुक्त समाज व्यवस्था आणि संगीताचा आधार घेत व्यापक समाज स्वास्थ्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने अलौकिक असे काम केले 

असल्याचे शरद शेजवळ यांनी सांगितले नव्या पिढीने कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी घेतलेला सत्यशोधकी समाजरचनेचा वारसा जतन करावा व राष्ट्रउभारणीसाठी समतेचा आग्रह धरत समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्या होटावर राष्ट्रभक्ती चे गीत सदैव खेळते ठेवावे त्यातूनच उद्याचा भारत हा सर्वांगीण विकास करू शकेल माणसामाणसांमधील भेड धर्मा धर्मातील वेद पंथा पंथातील भेद हे सुदृढ मानवी स्वास्थ्याचे लक्षण नसून विकृत समाज आणि पर्यायाने विकृत राष्ट्र निर्माण करेल त्याकरता सर्व प्रकाराच्या तान तनाव आला सकारात्मक विचारसरणी आचरणाची जोड देऊन तणावमुक्त व्यक्ती आणि समाज स्वस्थ्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन राष्ट्र बळकटीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे शरद शेजवळ यांनी विचार व्यक्त केले

या प्रसंगी उपप्राचार्य ए. एल.गायकवाड, डॉ.पी. पी. परमार हेही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. श्रीमती एस. के. आहेर ,प्रा श्रीमती एरंडे यांनी प्रयत्न केले सूत्रसंचलन प्रा सी. डी. निकम यांनी केले.