सुकळी येथे अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर

31

🔹सामाजिक बांधिलकीतुन विविध उपक्रम

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.8जून): – येथून जवळच असलेल्या सुकळी येथे राजमाता पु.अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी करुन महिला व पुरुषांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संयोजन समितीने सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुकळी ता.धारूर येथे कोरोना कालखंडानंतर यावर्षी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष बंडूजी खांडेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोळंके, ग्रामसेविका मीरा दिवटे यांची उपस्थिती होती. पत्रकार अशोक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. बिभीषण सांगळे यांच्या चमूने रक्त संकलन केले. यावेळी गावातील महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य सल्लागार जगताप यांनी चाळिशीनंतर शरीरात होणाऱ्या बदलाची माहिती सांगून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा याबाबत सविस्तर माहिती सांगितली. दिपाली गायकवाड यांनी महिलांच्या विविध समस्या व त्यांचे निराकरण याबाबत महिलांमध्ये जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच नियमितपणे व्यायाम व पौष्टिक आहाराचे महत्त्व विषद केले.
यावेळी ह.भ.प.दिगांबर महाराज वाघमोडे यांचे कीर्तन झाले. महाराज कीर्तनात म्हणाले की, आम्हाला पुराणातील गौतम ऋषींची अहिल्या माहीत आहे. प्रभुरामचंद्रांनी तिचा उद्धार केला ही कथा सर्वश्रुत आहे. मात्र कलियुगात मागच्या तीनशे वर्षांपूर्वी जन्मलेली अष्ठावधानी राणी अहिल्याबाई होळकर व त्यांचा क्रांतिकारी इतिहास आपल्याला समजला पाहिजे असे असेही ते म्हणाले. या युगात हिंदूंसाठी अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय असल्याचेही महाराज म्हणाले.मृदंगसाथ किसन महाराज कावळे यांनी केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवीनारायण गलांडे, लहुदास काळे, अभिमान लव्हाळे, ज्ञानोबा लव्हाळे,अशोक काळे, बालासाहेब लव्हाळे, आत्माराम काळे, सिद्धेश्वर झोडगे, हनुमंत गलांडे, विलास झोडगे, प्रभू राऊत, गणेश झोडगे, लक्ष्मण बीडगर, माऊली कोपनर , मुरली गवळी, हनुमंत काळे,संपती काळे, व्यंकटेश वाघमारे, खंडेराव गवळी, राहुल सोनवळे, राजेभाऊ सौंदनकर, अर्जुन गवळी, बाबासाहेब गवळी, माणिक गवळी , श्रीमंत मेंडके, वाल्मीक पांचाळ, बलभीम गवळी, माऊली बीडगर, रामेश्वर झोडगे, महादेव झोडगे, पुरुषोत्तम केळवे, शिवाजी गलांडे दिगंबर झोडगे, अर्जुन गलांडे, बळीराम कोकरे,श्रीधर लव्हाळे, जनार्धन झोडगे,भास्कर लव्हाळे, सुनील लव्हाळे, हनुमंत गवळी, रामभाऊ राऊत, उत्तम थावरे, अंगद लव्हाळे, रमेश झोडगे, नवनाथ बंडगर, सिद्धेश्वर गलांडे, सुमंत माने यांनी परिश्रम घेतले.सायंकाळी गावातून अहिल्यादेवींच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.