आदिवासी अस्मिता, स्वायत्तता आणि संस्कृतीला वाचवण्यासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा प्रेरणादायी! – भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

97

🔸घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.9जून):- येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आदिवासी अस्मिता, स्वायत्तता आणि संस्कृतीला वाचवण्यासाठी तत्कालिन ब्रिटिश व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून जंगल व जमिनीसाठी लढा देणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.तसेच मोदी सरकारने आदिवासी बांधवांच्या कल्याणार्थ राबविलेल्या योजनांची माहिती देऊन केंद्र सरकारला झालेल्या ०८ वर्षपुर्ती निमित्ताने सरकारच्या विविध योजनांच्या पत्रकाचे वितरण करण्यात आले यासोबतच आदिवासी योजनांच्या लाभार्थ्यांनाही योजनांची माहिती देऊन त्यांच्याशी याठिकाणी संवाद साधण्यात आला.

यावेळी बोलताना, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी, आदिवासींच्या हक्कासाठी इंग्रजांशी लढा देत देशभरातील आदिवासींमध्ये नवचैतन्य जागवण्याचे कार्य करणाऱ्या “धरती आबा” भगवान बिरसा मुंडा यांना मी अभिवादन करतो.ब्रिटीश काळात सरकारचे शोषण आणि दडपशाहीचे धोरण शिगेला पोहोचले होते. जमीनदार, जहागीरदार, सावकारांनी आदिवासींचे शोषण केले. आदिवासींची जमीन व्यवस्थाही विस्कळीत होत होती. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे प्रबोधन केले.आदिवासींसाठी दिलेल्या योगदानामुळेच देशाच्या संसद संग्रहालयात त्यांचे चित्र आहे. असे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना, मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातातील केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून देशभरात १५ नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. पंतप्रधानांनी रांची येथे भगवान बिरसा मुंडांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालय तयार केले. मोदी सरकारने आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी देशात अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. आदिवासींचा विकास साधण्यासाठी मोदी सरकारने राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था स्थापन केली. आदिवासींची जीवनशैली, संस्कृती आणि क्षमतांचा अभ्यास करुन त्यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने मोदी सरकार तत्पर आहे. असेही ते म्हणाले.

याप्रसंगी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री विजय आगरे, विनोद चौधरी, सतीश खोके, बबलू सतपुते, संजय भोंगळे, साजन गोहने, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, विवेक तिवारी, श्रीराम जेऊरकर, श्‍याम आगदारी, परशुराम पेंदोर, रवी उईके, सुकेश मेश्राम, सुरेंद्र जोगी, कोमल ठाकरे, देवानंद ठाकरे, वंचित आगदारी, तुळशीदास ढवस, अमोल तुलसे, प्रणय झोडे, जय बोबडे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, सुनंदा लिहीतकर, उमेश दडमल, शितल कामतवार, खुशबू मेश्राम, भारती पर्ते, दुर्गा साहू, स्नेहा कुमरवार यांचेसह आदिवासी बांधव, लाभार्थी उपस्थित होते.