स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणारी अहिंसा पतसंस्था- अभिनेत्री दीप्ती सोनवणे

71

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.9जून):-सोने खरेदी तारण कर्ज शुभारंभप्रसंगी प्रतिपादन म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये नुकताच सोने खरेदी तारण कर्ज शुभारंभ सोहळा पार पडला याप्रसंगी उद्घाटक तुझ्यात जीव रंगला फेम चंदा उर्फ अभिनेत्री दीप्ती सोनवणे यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक स्वप्न असते सोन्याचे चार अलंकार आपल्याकडे असावेत आणि या भावनेला जपत अहिंसा पतसंस्थेने स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणारी ही कर्ज योजना सुरू केली या पाठीमागे खूप मोठा सामाजिक आशय आहे. यावेळी दीप्ती सोनवणे पुढे म्हणाल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांनाही संधी देण्यासाठी मी प्रयत्न करेन.तसेंच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील एक संवाद म्हणून त्यांनी आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माणगंगा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ.पी.डी. सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी, अहिल्या शिक्षण संस्थेचे संचालक लुनेशराव विरकर(खोत), ज्ञानवर्धिनी हायस्कुल चे प्राचार्य जे.डी. मासाळ, जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे,सौ भारती सोनवणे,महेश सोनवले यांची होती.यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले,प्रत्येक महिलेच्या मनात सुप्त इच्छा असते की,आपल्याकडे दागिने असावेत परंतु सर्वांची आर्थिक परिस्थितीमुळे ही इच्छा पूर्णत्वास जात नाही.महिलांच्या भावना ओळखून अहिंसा पतसंस्थेने सुवर्ण खरेदी कर्ज योजना सुरू केली असून सहजरित्या याचा लाभ सगळ्यांनाच घेता येईल. घरच्या कर्त्या माणसांनाही वाटत असते की सोने हे ऐनवेळी उपयोगी येणारी वस्तू असून ती आपल्याकडे हवी आहे.

म्हणूनच पतसंस्थेने या लोकभावनेचा विचार करूनच ही योजना सुरू केली आहे. अभिनेत्री दिप्ती सोनवणे या म्हसवडच्या सुकन्या असून त्यांचा सर्वानाच अभिमान आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्यांच्या चंदा या भूमिकेने साऱ्या महाराष्ट्राला मोहित केले आहे.प्रमुख पाहुणे डॉ.पी.डी. सोनवणे यांनी मनोगतात सांगितले की भिकाऱ्याचे डॉक्टर म्हणून जे अहोरात्र सेवा करतात ते माझे चिरंजीव डॉ.अभिजित, कला क्षेत्रात काम करणारी माझी मुलगी दिप्ती व अर्थ सल्लागार म्हणून केंद्रात काम करणारा अमित अशी आम्हाला अभिमान वाटणारी मुले असून म्हसवडच्या मातीला आम्ही सोनवणे कुटुंबीय कधीच विसरणार नाही.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. वसंत मासाळ म्हणाले, अहिंसा पतसंस्था हे नुसते आर्थिक व्यवहार करीत नाहीत तर समाजाची गरज ओळखून नवनवीन कर्ज योजना आखत असते जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाची गरज भागेल.

अहिंसा ने सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातही एक वेगळा ठसा उमटवला आहे. कित्येक व्यक्ती, संस्थांना अडचणीच्या काळात आर्थिक हात दिला आहे.अहिंसाच्या या नवीन कर्ज योजनेमुळे बऱ्याच जणांच्या घरी सोने असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे, ज्ञानवर्धिनी हायस्कुलचे प्राचार्य जे.डी.मासाळ सर,अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर,महेश सोनवले यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी फेडरेशन चे वसुली अधिकारी श्री शिंदे साहेब,संस्थेचे व्हाईस चेअरमन अजितशेठ व्होरा,संचालक प्रीतम शहा,अभिराज गांधी,सोमेश्वर केवटे,सुशील त्रिगुणे,अतिश गांधी व अनेक मान्यवर उपस्थित होते.