दाई जंगो रायताड गोंडीयन बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने क्रातीसुर्य बिरसामुंडा स्मृतीदिन साजरा

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.10जून):- दाई जंगो रायताड गोंडीयन पेणठाना वडाळा (पैकू ) येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीराम मडावी, प्रमुख पाहुणे डॉ राजू मडावी, होमराज सिडाम यांचे उपस्थित कार्यकाचे आयोजन करण्यात आले. मोतीराम मडावी यांचे हस्ते बिरसा मुंडा यांचे फोटोचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मोतीराम मडावी यांनी आपल्या भाषणात बिरसा मुंडा यांचे जिवनावर प्रकाश टाकला.

डॉ. राजू मडावी यांनी आपल्या समाजात अनेक थोर पुरुष होऊन केले त्यांचे जिवन चैरीत्र आजच्या तरुण पिठिने वाचन केले पाहीजेत व आपले जिवनमान उंचावले पाहिजे असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. होमराज सिडाम यांनी मनोगत महापुरुषांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश कोडापे व आभार प्रदर्शन नंदू सोयाम यांनी केले

कार्यक्रमाला हर्षल मसराम,पार्थ मडावी,प्रकाश कोडापे ,होमराज सिडाम,नंदू सोयाम, बेबी कोडापे, विद्या मडावी ,उषा मसराम ,आशा मडावी, आशा मोतीराम मडावी व गोंडीयन आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED