मागच्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या काळासाठी एकजुटीने कामाला लागा – विजयसिंह पंडित

88

🔸सुशिवडगाव येथे १ कोटी ४० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.१०जून):-लोकांसाठी सदैव काम करत राहणे, ही दादांची शिकवण आहे. त्याला अनुसरून काम करणे हे आमचे कर्तव्य समजून सत्तेचा दुरुपयोग न करता सदैव सदुपयोग केला. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रस्ता, पाणी, आरोग्य या मूलभूत विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी तालुक्यासाठी खेचून आणला . आपण त्याचा विचार करून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीर उभे राहावे. ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनी तुमच्यासाठी काय केले ? हा प्रश्न विरोधकांना विचारा आणि मागच्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या काळासाठी एकजुटीने कामाला लागा असे आवाहन जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. सुशिवडगाव येथे एक कोटी चाळीस लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

सुशिवडगाव येथे १ कोटी ४० लक्ष रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, पंचायत समितीचे गटनेते परमेश्वर खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक अतकरे, नगरसेवक शाम येवले, दत्ता पिसाळ, संदीप मडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, शिवछत्र परिवाराने विकासकामात कधीही राजकारण केले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आणि सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जात आहेत. ही कामे दर्जेदार पद्धतीने करुन घेण्याची जबाबदारी तुमची आहे. योजना कारणी लागण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. येणाऱ्या काळात तुमच्या आणि तालूक्याच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना पाठबळ द्या असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी गटनेते परमेश्वर खरात यांनीही आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी भागवत काळे, नकुल औटे, महेश औटे, अशोक काळे, विक्रम कदम, अजित काळे, बबन औटे आदिनाथ माळी, अशोक वारे राजेंद्र राऊत, भाऊसाहेब काळे, वाल्मिक कदम, हनुमंत औटे, मयुरद्वज ओटे, युवराज जाधव, विजय पवळ मच्छिंद्र मैंद, पांडुरंग मुळे, प्रल्हाद मैंद,पाराजी गायकवड, कारभारी डिंगरे, भिमसेन डिंगरे, सदाशिव वाळेकर, ज्ञानोबा मैंद, श्रीमंत शेंडगे,बंडू घाडगे, गणेश डिंगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.