नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करा- मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनातून मागणी

✒️सय्यद शब्बीर जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.10जून):- इस्लाम धर्माचे धर्मगुरू पैगंबर हजरत मोहम्मद साहेब साऱ्या जगाला सुख शांती भाईचाराचा संदेश देणारे पैगंबर साहेबांचा विरोधात आझमगड वाराणसी येथील ज्ञानवापी मस्जिद विषयावर डिबेट साठी बोलवण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तया नुपूर शर्मा यांनी डिबेट कार्यक्रमात इस्लाम धर्माचे धर्मगुरू पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा विरोधात विवादास्पद टिप्पणी केली इस्लाम धर्माचे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.जगातील मुस्लिम समाज व तसेच सर्व समाज व सर्व धर्माला मानणाऱ्या च्या भावना दुखावल्या गेल्या आहे.भारतीय संविधान कोणत्याही व्यक्ती किंवा समाज व धर्माला मानणाऱ्या धर्माच्या धर्मगुरू च्या विरोधात विवादास्पद टिप्पणी करण्याची परवानगी देत नाही.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तया नुपूर शर्मा यांनी डिबेट मध्ये देशात दंगली घडवून आणण्याच्या उद्देशाने पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा विरोधात विवादास्पद टिप्पणी केली आहे मुस्लिम समाजाचे मनदुखावले म्हणून दि. १० जुन रोजी पोलिस स्टेशन जिवती येथे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वर आईपीसी कलम २९५ए १५३ए ५०५ बी.अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन भारतीय मुस्लिम परिषद तसेच जिवती तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देताना उपस्थित महेबुब भाई शेख विदर्भ प्रमुख तसेच प्रदेश प्रवक्ता गोंडवाना गणतंत्र पार्टी, शेख जब्बार काॅंग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना,हकानी शेख तालुकाध्यक्ष मनसे इत्यादी उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED