वादळी वाऱ्याने शेतातील सौरऊर्जा कृषीपंपाचे मोठे नुकसान

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

परळी(दि.11जून):-तालुक्यातील पिपंरी बु येथील राठोड माणिक गुलाब यांच्या शेतातील दिनांक 8 वार बुधवार रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने शेतामध्ये लावलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंपाचे अतोनात नुकसान असुन विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी कसे द्यावे हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. शासनाच्या वतीने सत्कार शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंपाचे वाटप करण्यात आले होते.

त्यामध्ये परळी तालुक्यातील पिपंरी बु येथिल शेतकरी राठोड माणिक गुलाब (लाभार्थी क्रमांक 5234224101112840) यांच्या शेतातील सौरऊर्जा कृषी पंप वादळी वाऱ्याने उपटून पडल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सबंधित विभागाने लवकरात लवकर राठोड माणिक गुलाब यांच्या शेतातील सौरऊर्जा पंपाच दुरुस्ती करुण विद्युत पुरवठा सुरुळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

 

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED