पोलीस उपाधिक्षक पुरुषोत्तम पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

47

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.11जून):-महाराष्ट्रातील आई महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या राज्य राखीव पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असणारे *सहाय्यक समादेशक पुरुषोत्तम पाटील यांना राठोड फाउंडेशन व योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्स यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पोलीस अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.*

हा पुरस्कार कोल्हापूर मधील पोलीस अधिक्षक कार्यालय (एस.पी.ऑफीस) येथे सन्माननीय पाहुणे महाराष्ट्र शासन मराठी विश्वकोश सदस्य डॉ. कृष्णदेव गिरी, (आंतरराष्ट्रीय योगसद्गुरू), डॉ.सुरेश राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील व डॉ.सुशील अग्रवाल यांच्या हस्ते डी.वाय.एस.पी. पुरुषोत्तम पाटील यांना प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. कृष्णदेव गिरी म्हणाले मी व डी वाय एस पी पाटील अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर एकत्रित आलो आहे. अनेक अधिकारी पाहिले पण यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला आहे.

यानंतर शिवाजीराव पाटील म्हणाले डी.वाय..एस.पी. पाटील व माझी मैत्री अनेक वर्षापासून आहे. त्यांनी माझ्या सामाजिक कार्यामध्ये ज्या ज्या वेळी सामान्य व्यक्तीला मदत लागेल त्या वेळी स्वतःच्या वेळेचा विचार न करता मदतीला नेहमी तत्पर असतात. त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा पुरस्कार होणे म्हणजे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.या नंतर पुरस्कार प्राप्त सहाय्यक समादेशक पी आर पाटील म्हणाले, हा पुरस्कार माझ्याबरोबर कार्यरत असणाऱ्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचा आहे. आम्हाला नेहमीच समादेशक संदीप दिवाण यांचे सहकार्य असते. म्हणूनच सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उत्साहाने व आनंदाने कार्यरत आहेत.या कार्यक्रमाला ऐश्वर्या शिंगे व विविध पोलीस कर्मचारी उपस्थित होते.