जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्याम झंजाळ याचा सत्कार

🔸भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11जून):-नुकताच 12 वी चा निकाल जाहीर झाला असून श्याम सुधीर झंजाळ यांनी विज्ञान शाखेतून 96.66%  मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला, त्याच्या या यशाचे कौतुक करण्याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचे सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शुभेच्छा देतांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आम.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आम.आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, राजनिकांत मोटघरे, आनंदराव आकरे,दिवाकर निसार, जितेंद्र मूनघाटे, हरबाजी मोरे, वसंत राऊत, सुधीर बांबोळे, प्रशांत कोराम, जावेद खान, मिलींद बागेसर,ढिवरू मेश्राम,वडील सुधीर झंजाळ त्याची आई आणि सर्व परिवारा सह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED