प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्या प्रकरणी मुळावा येथे निषेध

59

🔹बाजार पेठ कडकडीत बंद ठेऊन व्यापारी वर्गाने केले सहकार्य 

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)

मुळावा(दि.11जून):-दिनांक २७/०५/२०२२ बिजेपी प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन कुमार याने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर हेतुपूर्वक अवमान केल्याने मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्याने त्याचा निषध म्हणून दिनांक १० जून रोजी मुळावा बाजार पेठ सकाळी ८ ते २ वाजे पर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आली त्यास व्यापारी वर्गाने सहकार्य केले.

नुपूर शर्मा व नवीन कुमार याने प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केल्याने सर्व मुस्लिमाच्या भावना दुखावल्या असून प्रेषितां बद्दल अपमानास्पद ,खोटे ,आणि दुखावणारे शब्द वापरल्याने सर्व मुस्लीन समाज दुखी झाला असून अशी समाज विघातक कृत्य करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार मुळावा येथील मुस्लीम बांधवानी पोलीस स्टेशन पोफाळी येथे केली असून असे कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

भारत हा सर्व धर्म समभाव मानणारा देश असून सर्वच थोर समाज सुधारक,संत,यांचा आदर करणारा देश असून काही व्यक्ती हेतुपुर्स्कर भावना भडकावण्याचे काम करतात त्यामुळे देशाचे वातावरण खराब होत आहे त्यामुळे अशा लोकांनवर वेळीच कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली.शुक्रवार च्या नमाज नंतर निषेद च्या घोषणा देण्यात आल्या व सर्व सहकार्य करणारे व्यापारी बंधू ,पोलीस कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.