औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा चंद्रपूर ची नवीन कार्यकारिणी गठित

✒️संजय बागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-96898 65954

नागभीड(दि.11जून):-औषध निर्माण अधिकारी संघटना जील्हा चंद्रपूर ची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष पदी – राजेश वाघमारे तर उपाध्यक्ष पदी – रत्नदीप वंजारी यांची निवड करण्यात आली.

त्याचप्रमाणे सचिव- कमलेश निरंजने, कोषाध्यक्ष- किशोर नेताम, सहसचिव- आनंद भानारकर प्रसिद्धी प्रमुख प्रसाद आलुरवार, मुख्य जिल्हा संघटक म्हणुन रामकृष्ण गीते,लोकेश ढगे,संघटक निनाद अवझे, बाळकृष्ण सिडामे,धीरजकुमार गेडाम, गजानन कोलसगे, विकास दडमल, प्रकाश लोखंडे, गजानन काईट, दीपक इंगले तर महिला प्रतिनिधी अश्विनी गेडाम तसेच प्रमूख सल्लागार समितीमधे राजेंद्र तांबेकर, घनश्याम पिंपळकर, प्रशांत लधोंगडे, महेश पाहूनकर,अभय एडलावार, दीपक पवार,चेतन जुमनाके, सूरज राखडे, सूरज मेश्राम,किशोर कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणें प्रस्तावित मागण्यावर चर्चा करन्यात आली.

त्या याप्रमाणे 1) इतर एकेरी पद(लेब techne)प्रमाणे औ.निर्माण.अधिकारी यांना सुध्दा महिन्याचा दुसरा आणि चवथा शनिवार सुट्टी देन्यात यावी.2) सर्व प्रा.आ.केंद्र येथे सेकंड फार्मासिस्ट(परमेनेट कीव कांट्रेक्ट वाढीव पद) देन्यात यावा.3) सर्व प्रा.आ.केंद्र येथे फार्मेसी ऑफिसर कक्षात स्वतंत्र परीचर/पी टी ए पुरुष देन्यात यावे. जेनेकरून स्टोर व्यवस्थापन व औषधि व्यवस्थापन सृढढ़ होइल.4)एनएचएम / कांट्रेक्ट फार्मेसी ऑफिसरला परमेन्ट करून रिक्त प्रा आ केंद्र येथे पद भर्ती करण्यात यावी.5) एसेट कीव लिनेनच फार्मेसी ऑफिसरच काही संबंध नाही ठेवावे, आणि आले जरी तर संबंधित ज्यांना हैंड ओवर केले आहे त्यांना जवाबदारी देण्यात यावी.6)संगणक सोबत इंटरनेटचे दैंनदीन वापरने खूप वाढले आहे त्यामुळे फार्मेसी ऑफिसरांना ही मासिक इंटरनेट भत्ता देन्यात यावा.नाहीतर पुरेपूर इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन द्यावी.7)इतर कर्मचारी प्रमाणे फार्मेसी ऑफिसर यांना ही डीईओ (डाटा एंट्री ऑपरेटर) स्वतंत्र देन्यात यावा. अश्या औषध निर्माण संघटनेच्या मागण्या आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED