बिरदवडी चाकण येथील बाबुराव पवार महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघड-प्रभारी मुख्याध्यापक व संस्था अध्यक्षा यांना पोषण आहार विकताना रंगेहाथ पकडले: एका शिक्षिकेच्या बहाद्दूरीला सलाम

29

✒️मनोहर गोरगल्ले(खेड,विशेष प्रतिनिधी)

चाकण(दि.11जून):-बिरदवडी गावातील बाबुराव पवार महाविद्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण व संस्थेची अध्यक्षा तसेच पिंपरी चिंचवड मधील प्रतिष्ठित महाविद्यालयातील प्राध्यापिका देवयानी पवार यांनी शालेय मुलांचा पोषण आहार चक्क एका कॅटिंग वाल्याला विक्री करत असताना एका पुष्पा म्हसे नामक बहाद्दूर शिक्षिकेच्या चातुर्य पणामुळे हा प्रताप उघड झाला.पुष्पा म्हसे घरी जात असताना जवळच असलेल्या बिरदवडी येथील बाबुराव पवार महाविद्यालयात एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन शाळेच्या पोषण आहार साठवणूक खोलीजवळ उभी असल्याचे शिक्षिका पुष्पा म्हसे यांना दिसले. सदर, वाहना जवळ गेल्या असता त्या ठिकाणी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण व संस्थेच्या अध्यक्षा व स्वतः प्राध्यापिका असलेल्या देवयानी पवार कॅटिंगवाला वाळुंज व त्यांच्या सोबत असलेला ड्रायव्हर हे दोघे मिळून घाईघाईने शाळेतील शालेय पोषण आहार रूममधून धान्याचे पोटे सदर वाहनांमध्ये भरत असल्याचे दिसून आले.

यावर या बहाद्दूर शिक्षिकेने उपस्थित प्रभारी मुख्याध्यापक व संस्थेची मुजोर अध्यक्षा विचारले असता, मुजोर अध्यक्षा देवयानी पवार व मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण यांनी या शिक्षिकेस ओरडून सांगितले की, आम्ही धान्य विकू अथवा काही करू असे म्हणून येथून निघून जा असे म्हणून.त्या गाडी चालकाने त्या शिक्षिकेला ढकलून पळून जाण्याचाही प्रयत्न केले. तेव्हा या शिक्षिका थेट गाडीवर चढल्या शेवटी या बाई माघार घेत नाही हे पाहिल्यावर त्या गाडी चालकाने गाडी सोडून पळ काढला. पुष्पा म्हसे यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे. यानंतर पुष्पा म्हसे यांनी पोलीस कंट्रोलरूमला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. यावर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्यानंतर सदर गाडी धान्याच्या पोत्यांसह पोलीस स्टेशनला नेण्यात आली. मुख्याध्यापक व संस्थेच्या अध्यक्षा व स्वतःप्राध्यापिका असलेल्या देवयानी पवार यांच्यावर परिसरातून कडक कारवाईची मागणी होत आहे.व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता पालक वर्गातून होत आहे. यावर आता पुणे शिक्षण विभाग काय कारवाई करतो हेच पहावे लागेल.

त्या ठिकाणचे स्थानिक शोभा मच्छिन्नद्र पवार यांनी सांगितले की, याठिकाणी या अगोदरही बऱ्याच वेळा धान्य विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही गाडी पकडून देण्यास स्थानिक मच्छिन्नद्र बाबुराव पवार व त्यांच्या मुलानेही सहकार्य केल्याचे पुष्पा म्हसे यांनी सांगितले.या प्रकरणात पुष्पा म्हसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संस्था अध्यक्षा, देवयानी पवार, प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण, ईशान पवार, अनिल चौगुले यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार ४०८, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक एम एच १२ सी.एच ५१८२ नंबरची पिकअप गाडीसह १५ पोती तूरडाळ व तांदूळ अंदाजे ३० हजार किमतीचे धान्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड व त्यांचे सहकारी करत आहेत.