


✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.11जून):-दि.१४ जुन मंगळवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० वाजेपर्यंत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीत जागतिक रक्तदाता दिवस निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असुन देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कंपनीचे व्यवस्थापक कमिटीतर्फे करण्यात आले आहे.




