नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ईसापुर धरण येथील मुस्लिम समाजानी केला निषेध

82

🔸ईसापुर धरण येथील मुस्लिम समाजाने दिले नुपुर शर्मा विरुद्ध निवेदन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12जून):-तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे इसापूर धरण येथील मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचे प्रेरणास्रोत आणि सर्वात प्रिय आणि आदरणीय प्रतीक असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्या बीजेपी राष्ट्रीय प्रक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात खंडाळा पोलीस स्टेशन येथील ठाणेदार शेंगापल्लू साहेब यांना इसापूर धरण येथील मुस्लिम बांधवानी निवेदन दिले.

बीजेपी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टाइम्स नाऊ टीव्ही चॅनेलवरून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते असे मुस्लिम समाजाचे म्हणणे असून, नुपूर शर्मा आणि टाइम्स नाऊ टीव्ही चॅनेल विरुद्ध अपमानस्पद टिप्पनी करून आणि दुर्भावांनापूर्ण इस्लामचा अपमान करून पैगंबर मोहम्मद यांचा हेतूपरस्पर अपमान केला त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना देखील दुखावल्या म्हणून इसापूर येथील समस्त मुस्लिम समाजाने निवेदना मार्फत समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा लोकांवर वेळीच योग्य ती कार्यवाही करावी अशी तक्रार देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी इसापूर धरण येथील सर्व मुस्लिम समाज उपस्थित होता. इसापूर धरण येथील मुस्लिम बाधंवानी नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ रॅलीसुद्धा काढली होती.भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा देश असून सर्वच समाजसुधारक आणि संताचा आदर करणारा देश आहे, काही लोक हेतूपरस्पर भावना भडकवण्याचे काम करतात त्यामुळे देशातील वातावरण खराब होत असते. त्यामुळे अशा लोकांवर वेळीच कठोर कारवाही झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.