


✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.13जून):-शहर व परिसरात मृग नक्षत्र पावसाचे आगमन होताचनाशिकमध्ये वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना सुरू झाल्या असून काल शनिवारी नाशिक ञ्यबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कल व आयटीआय सिग्नल च्या मध्ये असलेल्या कुक्कुटपालन केन्द्र समोरील गुलमोहर झाड चालत्या रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. नाशिकच्या आयटीआय सिग्नजवळ हा अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालक व एक प्रवाशी महिलेचा करुण अंत झाला.
या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.पोपट कृष्णा सोनवणे असे रिक्षा चालक तर शैला शांतीलाल पटणी असे प्रवासी ठार झाले ल्या महिला असुन रिक्षाचालक सोनवणे एम एच एफ यु 0360 नाशिक शहर कडून सातपूर कडे जात असताना अचानक गुलमोहर वृक्ष उन्मळून पडले व दुदैवी घटनेत दोघांसह रिक्षाचा चेंदामेंदा झाला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या जवानांनी व सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत रिक्षाचालक व महिला प्रवासी रिक्षा मध्ये अडकुन होते.अग्नीशामक दलाच्या जवानांनी श्रींचे प्रयत्न करून रिक्षा वर पडलेले झाड दुर केले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. तसेच पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. मात्र झाड रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालक आणि महिला दोघेही अडकून होते. या दोघांना काढण्यासाठी स्थानिक नागरिक सह पोलिसांनी मदतकार्य केले. बरीच उशिराने या दोघांना काढण्यात आले.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दुर्दैवी घटना झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दोघाही मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.अपघातात मयत झालेल्या महिला शैला पटणी या गंजमाळ येथील सहवास नगर परीसरात वास्तव करत होत्या नोकरी निमित्त त्यांना अंबड औद्योगिक वसाहतीत जावं लागतं होते त्यामुळे पटणी यांनी सोनवणे यांची रिक्षा महिन्याप्रमाणे फिक्स केलेली होती.
जीवघेणी झाडे, प्रशासन करतंय काय?दरम्यान पावसाळ्यात झाड कोसळल्याच्या अनेक घटना समोर येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळीच पावसाळापूर्वी या झाडांची छाटणी करण्यात येते. अंतर अनेकदा छाटणी करून वादळी पावसात हि झाडे उन्मळून पडतात. विशेष म्हणजे घटना घडल्याच्या सुमारास पाऊसही नव्हता. मात्र झाड कोसळले. अशा झाडांची प्रशासनाकडून दखल घेऊन वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांना अशा प्रकारे जीव घेणे ठरणार नाही.पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर सातपूर मनपा विभाग च्या उद्यान विभागाने १७२ सुकलेली झाडे काढण्यात आली असून अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत तर तक्रारी असलेल्या धोकादायक झाडे काढण्याचे काम सुरू असल्याचे मनपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे




