गीताभवन, औरंगाबाद येथे योग – अभ्यासातून उपचाराकडे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

29

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्युज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.13जून):-भारत सरकार च्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद तर्फे 21 जून 2022 मध्ये साजरा केल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय योग दिन काऊन्ट डाऊनच्या अंतर्गत योग – अभ्यासातून उपचाराकडे मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, प्रश्नमंजुषा, आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती औरंगाबाद – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद, योग संवर्धन संस्था, औरंगाबाद आणि प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2022 रोजी साजरा केल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय योग दिन-काऊन्ट डाऊनच्या अंतर्गत गीताभवन, एन 5, सिडको, औरंगाबाद येथे आज दिनांक 12 जून 2022 (रविवार) रोजी योग – अभ्यासातून उपचाराकडे मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, प्रशमंजुषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर उपस्थित योग तज्ञ, डॉ. दिपाली लोढा, योग संवर्धन संस्था, औरंगाबादचे अध्यक्ष, गोपाळ कुलकर्णी, योग संवर्धन संस्था, औरंगाबादच्या कार्याध्यक्ष, डॉ. चारूलता रोजेकर, प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, भरत कुलकर्णी, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, भारतीय योग संस्थान, महाराष्ट्र प्रांतचे उप प्रांत प्रधान, डॉ. उत्तम काळवणे, योग संवर्धन संस्था, औरंगाबादचे सचिव, श्रीकांत पत्की आदी उपस्थित होते. मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींचे स्वागत रोप देऊन करण्यात आले.यावेळी डॉ. दिपाली लोढा, डॉ. चारूलता रोजेकर आणि संतोष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पत्की यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. उत्तम काळवणे यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, औरंगाबाद यांनी शाहिरी पोवाडयाच्या माध्यमातून प्रबोधन केले आणि अरविंद लोखंडे आणि त्यांच्या विद्यार्थ्यानी योग प्रात्यक्षिक केले.या कार्यक्रमात उपस्थितांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रम समाप्ती नंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार यांनी परिश्रम घेतले.