स्वतःचेच महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून द्या …

31

🔹डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्राचार्य कडे मागणी

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(राजू कलाने)

अमरावती(दि.13जून):-गेल्या काही दिवसापासून अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे . विविध तक्रारी कथा निर्णय व घडामोडी यांदा सावरून विद्यापीठाने ऑफलाईन स्वरूपाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे घेण्यात येत आहे. अशा मध्येच अनेक वादविवाद झाल्या नंतर नव्यानेच आता एक विद्यार्थ्यांनी वादग्रस्त विषय महाविद्यालयात पुढे आणला आहे.

तो म्हणजेच अमरावती विद्यापीठातील काही महाविद्यालयांना त्यांचीच महाविद्यालय परीक्षा केंद्र मिळाल्याने अमरावती मधील
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय यामधील विविध सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांना स्वतःचे महाविद्यालय वगळून त्यांना दुसरेच महाविद्यालय परीक्षा केंद्र मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक नुकसान तथा कोरोना काळाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याच्या धोक्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त करून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ वर्षा देशमुख यांच्याकडे स्वतःचेच महाविद्यालय परीक्षा केंद्र मिळावे याकरिता निवेदन सादर केले आहे.

हे निवेदन देतेवेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर दाभाडे व प्राध्यापक प्रीती विधाते यांच्या उपस्थितीत अंजली आनंद मिश्रा राजेंद्र चंद्रशेखर कराळे रजनीगंधा ठाकूर मशिया मिर्झा, मोहम्मद शेख असंख्य विद्यार्थी हे निवेदन देतेवेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या दालनात उपस्थित होते