उठ मतदार राजा, जागा हो! हीच योग्य वेळ आहे!!

52

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक आता पुढ्यात येऊन ठेपली आहे,त्याचा पहिला टप्पा प्रभागाची पूनर्रचना झाली, दूसरा टप्पा उमेदवार निवडीसाठी आरक्षण जाहीर झाले…….आणि आता हळूहळू निवडणूक लढण्याची आपले वर्चस्व सिद्ध करीत उमेदवारी मिळविण्यासाठी ,जनतेत चर्चेत राहण्यासाठी सगळे राजकीय पक्ष आणि निवडणूक लढविण्यास उत्सुक उमेदवार जनतेच्या दरबारात आपल्या कार्याची छाप पाडण्यासाठी बाहेर पडणार आहेत.

*सावधान!*
नगरपरिषद मूल ६८ नवीन दुकानांच्या गाळ्यांचे बांधकाम करीत आहे , सगळ्यांचेच लक्ष या गाळ्यांवर असणार आहे. एक जागरूक नागरिक एक मतदार, एक ग्राहक म्हणून ही बाब आपण लक्षात ठेवा.
आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ ही मागणी करा की *हे गाळे मूल शहरात वास्तव्यास असलेल्या पण बेरोजगार तरुणांनाच रोजगार करण्यासाठी उपलब्ध व्हावे* ना *राजकीय वरदहस्त लाभलेल्या कुणा व्यक्तीला ना मूलच्या हद्दिबाहेरच्या व्यक्तीला ना दूसरीकडे व्यवस्थित दुकानदारी करीत असणाऱ्या कुठल्याही व्यावसायिकाला.* तर ते फक्त आणि फक्त बेरोजगार तरुणांनाच झाले पाहिजे.नाहीतर आधी वाटप झालेले गाळे कुणाला मिळालेत ते प्रत्यक्ष जाऊन बघा,असे व्हायला नको असेल तर वेळीच सावध व्हा , आपल्या हक्कासाठी लढायला सिद्ध व्हा.*एक मतदार, एक सर्वसामान्य ग्राहक,एक नागरिक म्हणून हा आपला अधिकार आहे.*आणि जो उमेदवार यासाठी तयारी दाखवेल आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणू शकतो अशाच उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

*जागो ग्राहक जागो*

(*विशेष सूचना- आमचे कार्यालयास प्राप्त अनेक तक्रारींच्या अनुषंगाने जनहितार्थ जारी)

✒️दीपक देशपांडेजिल्हा संघटक(अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर)मो:-9403285344