अल्कोहॉलिक अनानिमस 14 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 13जून):-ब्रम्हपुरी भागातील सेवा समूह ब्रम्हपुरीचा 14 वा वर्धापन सोहळा गंगाबाई तलमले महाविद्यालयात च्या पटांगणात संपन्न झाला.सदर कार्यक्रमात मद्यपाश् एक जीवघेणारा आजार या विषयावर जनजागृती सभा घेण्यात आली. हया कार्यक्रमात चंद्रपूर, वडसा, आरमोरी, लाखांदूर, सौदड, आणि गोंदिया भागातील सभासद उपस्थित होते.सदर कार्यक्रमात डाँ. प्रमोदजी महाजन चंद्रपूर, देशोन्नतीचे पत्रकार तथा ब्रह्मपुरी पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ .प्रमोदजी महाजन (ए क्लास ट्रस्टी मुंबई) यांनी ऐ. ऐ चा कार्यक्रम, दारू थांबल्यानंतर चे अध्यात्मिक जीवन, सभासदाचे समूहाप्रति कार्य आणि नवीन सभासदांनी सभा कशी समजून घ्यावी या बद्द्ल मार्गदर्शन केले.

बऱ्याच बाहेर भागातून आलेल्या सभासदांनी आपल्या मद्यपाणाच्या काळातील आणि मद्यमुक्त जीवनातील अनुभव सांगितले त्या द्वारे नवीन सभासदांना दारू मुक्त कसे राहता येईल हे अनुभवातून समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा समूह ब्रम्हपुरी चे सभासद उमेश डी. यांनी तर आभार समूहाचे बांधव श्रीकांत एम. यांनी केले.समूहाच्या सभासदमार्फत ज्या वेक्तीना दारू सोडणे ही समस्या झाली आहे किंवा ज्याचे जीवन दारूमुळे दुःखी झाले आहे त्यांनी या सभेत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.सेवा समूह ब्रम्हपुरी च्या नियमित सभा बुधवार, शुक्रवार आणि रविवारला साय 6 ते 7 वा सायंकाळी होतात हे सांगण्यात आले. ज्यांना मदतीची गरज आहे त्या साठी 8530347566, 9284786300, 9049114552 हेल्पलाईन नंबर देण्यात आले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED