


🔸मी नक्कीच जिल्हा परिषदसाठी उभा राहणार – मारोती गव्हाळे
✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)
माझ्या समाजकारणाला राजकारनाची जोड लाभल्यास जनतेची मला अधिक प्रभाविपने सेवा करता येईल.आपल्या जिल्हा परिषद निंगनुर गटाच्या सर्वांगीण विकास व्हावा. हे स्वप्न आपण सर्वांनीच नेहमीच पहिले आहे.या अगोदरही सर्कलममध्ये फक्त आणि फक्त सत्तापिपासू नेते, स्वतः ला नेते म्हणून घेणारे आणि विकासाचा बोजवारा वाजवणारे पहिले असेल.स्वतः चा पण या राजकारणाच्या भाऊगर्दीत विकास हरवून गेला तो गेल्या अनेक वर्ष्यात काही सापडलेला नाही.आता हा खुर्चीखेळ संपविण्याचा वेळ आला आहे.
मी गेली पंधरा वर्ष केवळ आणि केवळ सामाजिक बांधिलकीतुन आपली सेवा करत अहो. सर्वसामान्य जनतेशी माझी नाळ जुळली आहे.यामागे कोणताही राजकीय हेतू नसून,निव्वळ प्रत्येक समाजबांधवाच्या तसेच आपल्या माणसाच्या भल्याचा मी माझ्या आयुष्यात नेहमीच विचार करत आलो.पण म्हणतात व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग बनने आवश्यक आहे.आपण सर्वजण मिळून या सर्कलमध्ये विकासाचे एक नवे पर्व सुरु करू शकतो. शिक्षण, व्यापार, कला, स्वस्कृती,अत्याधुनिक ग्रामीण सुवीधा,आद्ययावत ग्रामीण सुविधा, आदर्श गाव, वस्त्या,वाडी, असे सुनियोजित विकास कामाचा मार्ग धरून आपण प्रगती पथावर वाटचाल करूया.
माझ्या समाजकारणाला राजकारणाची जोड लाभल्यास त्यांची योग्य सांगड घालत आपल्या जनतेची मला अधिक प्रभाविपने सेवा करता येईल.आपण माझ्या निर्धाराला बळ द्याल.व या प्रयत्नात मला यश मिळवून द्याल.याची मला खात्री आहे.चला सोबत प्रगतीच्या एका नव्या पर्वाकडे वाटचाल करूया,या वाटचालीत आपले सहकार्य, मार्गदर्शन,बळ, निश्चितच माझ्या पाठीशी खंबीरपने उभे असेल,आपल्या सहकार्याच्या जोरावर येणारी निंगनुर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविण्याचा माझा विचार आहे.या संदर्भात आपले मत, विचार, मार्गदर्शन मला कळवावेत,अशी विनंती मारोती गव्हाळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मारोती गव्हाळे यवतमाळ यांनी केली




