अनुलोम कार्यकर्त्यांनी शासनांच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा-अमित डमाळे यांचे आवाहन!

28

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)

येवला(दि.14जून):-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक संकल्पनेतून साकारलेल्या अनुलोम संस्थेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनांच्या योजना,सवलती, सुविधाची माहीती जनतेपर्यंत पोहोचवा यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे पाटील यांचे सहकार्य घ्या,असेअवाहन अनुलोम संस्थेचे विभागिय अध्यक्ष अमित डमाळे यांनी केले.

येवला- लासलगाव विधानसभा मतदार संघातील अनुलोम संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येवला येथे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी पुढे बोलताना डमाळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाणी आडवा पाणी जिरवा,सामाजिक वनीकरण व विविध योजनांचा लाभ जनतेला मिळवून दिला होता. याच धर्तीवर अजूनही काही नव-नवीन योजनेअंतर्गत लाभ लाभार्थ्यांना अनुलोमच्या व बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकाऱ्यांनी मिळवून देण्यासाठी अनुलोम कार्यकर्त्यांनी सामुदायिक प्रयत्न करावेत असे आवाहन डमाळे यांनी केले.

याप्रसंगी बाबासाहेब डमाळे यांनी तालुक्याची सामाजिक, भौगोलिक, मागासलेली परिस्थिती , पाणी, पाटपाणी, वीज प्रश्न व शासकीय कार्यालयाकडून जनतेची होणारी पिळवणूक, शासनाच्या विविध योजना वैयक्तिक लाभ जनतेपर्यंत पोहचत नाही.यासाठी प्रयत्न करावा लागणार असलल्याचे डमाळे यांनी सांगितले.

यावेळी संतोष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर आभार किरण लबडे यांनी मांनले. डॉक्टर सिताराम बैरागी, प्रकाश बजाज,किरण लबडे,विलास ढोमसे,संजय बोळीज, रवींद्र शेळके,संपत शेळके,गोरख घुसळे, भागवत जाधव,देवराम कदम, मुकुंद आहिरे, नितीन गायकवाड, दत्तात्रय सोमासे, मदन देवरे, सचिन शिंदे, मंगेश गायकवाड, दत्तात्रेय लगड,सोनू लहरे, महेश जाधव, संपत गारे,बापू साहेब मोरे, ज्ञानेश्वर देवढे, विशाल सोनवणे,योगेश खुळे, राजेश हिरे, भागवत शिंदे,साईनाथ काळे, चांगदेव शेळके, ज्ञानेश्वर शेळके, जय- प्रकाश वाघ,महेंद्र धोत्रे, राजेश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.