उदंडवडगाव येथील कला केद्रांची मान्यता रद्द करावी–विवेक कुचेकर

🔸कला केंद्र चालकाकडुन महिलांना जबर मारहाण व वेश्या व्यवसायासाठी जवरदस्ति

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.14जून):- तालुक्यातील उदंडवडगाव येथील कला केंद्र चालकाकडुन एका महिलेला मारहाण व लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस आली असुन तात्काळ या कला केद्रांचा परवाना रद्द करून कला केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,बीड तालुक्यातील माजंरसुब्यापासुन जवळच असलेल्या उदंडवडगाव येथील कला केद्रं चालकाकडुन मारहाण व लैंगिक शोषण झाल्याची तक्रार एका महिलेने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे तक्रारीत म्हटले आहे की, उदंडवडगाव येथील कलाकेद्रांत पाच वर्षांपुर्वी मला आणण्यात आले तेथे बैठक लावुन नाचायला लावुन जबरदस्तीने करायला लावले मी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये अॅडव्हान्स घेतले.

होते त्यामुळे ते माझ्याकडुन फक्त धंदा करून घेत पैसे देत नसत दि.०१ जुन २०२२ रोजी राञी ०८ वाजता पाय दुखत असल्यामुळे मी बैठकीत नाचू शकत नव्हते मी नाचत नसल्यामुळे आणि त्यांच्या मर्जी प्रमाणे राहत नसल्याने कलाकेद्रं चालविणारया भाभीने आणि नेकनुर येथील तिच्या एका कलाकेद्रांतील पार्टनरने माझ्यासोबत बळजबरी करण्याच्या हेतुने मला वायरने जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

पाणी न देता राञभर अंधारया खोलीत ठेवले दुसरया दिवशी पहाटे एका ट्रकमधुन जालना येथे व तेथुन सेलुला गेले गळयातील सोने गहाण ठेवुन मी बीडला आले माझी बारा वर्षाची अज्ञान मुलगी कलाकेद्रांवरील भाभीने व तिच्या पार्टनरने गायब केली केली आहे अशी माहीती पिडीत महिलेने दिली असुन उदंडवगाव येथील कलाकेद्रांवर महिलांना डांबुन बळजबरीने वैश्याव्यवसाय केला जात असल्याचे या घटनेमुळे उघड झाले असुन तात्काळ या कला केद्रांचा परवाना रद्द करून कला केंद्र चालकावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व तसेच पिडीत महिलेला योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED