देशात बोकाळलेल्या भष्ट्राचारावर पंतप्रधानांनी वेसण घालावे-हेमंत पाटील

32

🔹भष्ट्राचार स्वच्छता मिशन’राबवण्याची मागणी

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.14जुन):-देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची तमा न बाळगता लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची संपत्ती हडप करणार्या नेत्यांना तुरूंगात टाकावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.पंतप्रधानांनी ‘भष्ट्राचार स्वच्छता मिशन’ राबवून देशाला भष्ट्राचार मुक्तीच्या दिशेने अग्रेसर करावे,अशी विनंती देखील त्यांनी केली.नॅशनल हेराल्ड प्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करीत आहे.आता देशात स्वातंत्र्याप्राप्तीनंतर बोकाळलेल्या भष्ट्राचारावर वेसण घालण्यासाठी पंतप्रधानांनी कठोर पावले उचलावेत,असे आवाहन त्यांनी केले आहे.

याच अनुषंगाने यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी मंगळवारी पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे.लवकरच ते यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. भाजप मध्ये देखील धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नेत्यांची उणीव आहे.त्यामुळे असे भष्ट्र नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर देखील कारवाई करावी.जोपर्यंत अशा नेतृत्वावर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व उदयाला येणार नाही. केंद्रात सुरू असलेल्या विविध भष्ट्राचाराची घाण मोदींनी ‘प्रधानसेवक’ या नात्याने स्वच्छ केल्यास देशाच्या इतिहासात एक मुर्तीमंत उदाहरण ते प्रस्तुत करू शकतात.यानिमित्ताने पंतप्रधानांनी ‘भष्ट्राचार स्वच्छता मिशन’ राबवण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

दरम्यान,सोनिया आणि राहुल गांधी यांनी २०१० मध्ये यंग इंडिया नावाने कंपनी सुरू करीत दोन हजार कोटींची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असल्याने ईडीने पुन्हा तपास चक्रे फिरवली आहेत. पंरतु,केंद्रीय एजेन्सींना त्यांचा तपास करू देण्याऐवजी आंदोलन करून कॉंग्रेस केवळ ‘डॅमेज कंट्रोल’ करीत असल्याचे दिसून येत आहे. देशभरातील नागरिकांना वेठीस धरून देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेसने आंदोलन करीत भष्ट्राचाराचे आरोप झालेल्या आपल्या नेत्यांच्या पाठीशी उभी राहण्याची बाब खेदजनक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. खालच्या स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत सुरू असलेल्या भष्ट्राचारावर वेसण घालण्याचे काम केवळ पंतप्रधानच करू शकतात. मोदींनी त्यामुळे कठोर पावले उचलत योग्य उपाययोजना आखवीत अशी विनंती देखील पाटील यांच्यावतीने करण्यात आली.भष्ट्राचार करणाऱ्या प्रत्येक नेत्यांवर समान न्यायाने कारवाई केली पाहिजे.जनसेवकच अशाप्रकारे अपहार करतील, तर देशातून भष्ट्राचार हद्दपार होणार नाही. अशा नेत्यांवर त्यामुळे कडक कायदेशी कारवाई केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

कुठलीही सुचना न देता हस्तांरण कसे?

असोसिएट जर्नल्स लिमिटेड एजेएल द्वारा नॅशनल हेराल्ड प्रकाशित केले जात असून त्याचे संचालन यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड (वायआयएल) करते. २०१० मध्ये एजेएलचे १,०५७ भागधारक होते. नुकसान होत असताना त्याचे होल्डिंग यंग इंडिया लिमिटेड म्हणजेच वायआयएलकडे हस्तांतरित करण्यात आले.यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची कंपनीत ७६ टक्के भागिदारी आहे. उर्वरित २४ टक्के काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस (दोघेही निधन झाले आहेत) यांच्याकडे होते.पंरतु, वायआयएलने एजेएल अधिग्रहित केली तेव्हा कुठलीही सूचना देण्यात आली नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.