शहरवासीयांची अग्नीशमन वाहनाची प्रतीक्षा संपता संपेना

25

🔸चार नगर पंचायती पैकी नांदगाव खंडेश्वरलाच वगळले

🔹वाहन येणार की नाही प्रश्नचिन्ह कायम ?

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.14जून):-नगरपंचायत होऊन दहा वर्ष लोटले आहे अमरावती जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीला जिल्हा नियोजन समितीमधून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देणे बाबत ठराव झाला परंतु जिल्ह्यातील फक्त तीनच नगरपंचायतिला अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले मात्र नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या बाबतीत राजकारण आडवे आले नांदगाव नगरपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याने हे वाहन नगरपंचायतला मिळाले नाही त्यामुळे काही वृत्तपत्रांमध्ये याबाबत बातम्या प्रकाशित झाल्या त्यानंतर नगरपंचायतीला जाग घेऊन काही पदाधिकाऱ्यांनी भीष्मप्रतिज्ञा घेतल्या ? परंतु त्या प्रतिज्ञा हवेतच विरल्या त्यानंतर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपंचायतच्या विविध विकास कामासंदर्भात आढावा बैठक घेतली त्यावेळी आढावा बैठकीमध्ये अग्निशमन वाहनाचा मुद्दा प्रमुख्याने चर्चिला गेला त्या बैठकीत आगामी दोन महिन्यात नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला अग्निशमन वाहन उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री ठाकूर यांनी दिले त्या बैठकीनंतर याबाबत वृत्तपत्रांमध्ये टेंडर सुद्धा निघाले या विषयाला एक दोन नाही तर तब्बल सात महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून ही आढावा बैठक दिनांक 22 जुलै 20 21रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.

या बैठकीला प्रमुख उपस्थिती तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत दोन महिन्यात नगरपंचायतला अग्निशमन वाहन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण तब्बल सात महिन्याचा कालावधी उलटूनही या नगर पंचायतिला काही अग्नीशमन वाहन उपलब्ध झाले नाही याबाबत नगरपंचायतचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत त्यांच्या याच अडेलटट्ट पणामुळेच आजवर शहराचा विकास रखडला आहे येथे हम करे सो कायदा जनता जाये भाड मे या उक्तीचा प्रत्यय येतो आहे शहरात अद्याप परेन्तही हे वाहन का आले नाही ? याबाबत ज्यांनी जिल्हाधिकरी कार्यालयात ही आढावा बैठक बोलाविली होती त्यांनीसुद्धा विचारण्याचे सौजन्य केले किंवा नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि अग्निशमन वाहनाबाबत भीष्मप्रतिज्ञा घेणारे कुठे हवेत उडाले असा प्रश्नसुद्धा नागरिकांना आता पडला आहे अग्निशमन वाहनाबाबत नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचे अधिकारी कमालीचे उदासीन दिसून येत आहे त्यामुळे हे आता नगरपंचायतला वाहन उपलब्ध होईल किंवा नाही? याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे.

नादगाव नगरपंचायतच्या विविध विकास कामाबाबत जिल्हाधिकार्यालय अमरावती येथे जी आढावा बैठक झाली होती त्यामध्ये जे विषय चर्चिले गेले होते त्यापैकी एकही काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही हे उल्लेखनीय ! आणि याचा जाब नगरपंचायतला कोणत्याही लोकप्रतिनिधीनी समोर येऊन विचारला नाही हेही तितकेच खरे त्यामुळे नांदगाव खंडेश्वर मधील लोकप्रतिनिधी आहेत किंवा नाही हा प्रश्न नागरिकांच्या तोंडून आता ऐकावयास मिळत आहे शहरात अग्निशमन वाहन येऊ शकते ही आशा आता धूसर झालेली आहे असे नागरिकामध्येत आता बोलल्या जात आहे. खुद्द जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकी मधील कोणते कोणते विषय मार्गी लागले याबाबत जिल्हाधिकारी यांनीसुद्धा आढावा घेतला नाही किंवा नगरपंचायत ला विचारणा सुद्धा केली नाही खुद्द पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एक प्रकारची नांदगाव नगरपंचायतीने केराची टोपली दाखविली आहे त्यामुळे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी नगरपंचायत अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे
…………………………………….
*तालुक्यात आगीचा वाढता* *आलेख*
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दीवसे दिवस आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे तालुक्यात कुठेही आग विझविण्याचा यंत्रणा नसल्याने येथून लगत असलेल्या नेर परसोपांत, चांदूर रेल्वे,धामणगाव रेल्वे,बडनेरा आणि अमरावती येथून गाड्या बोलवाव्या लागतात आणि गाड्या आगीच्या ठिकाणी येईपरेंत बरेच नुकसान झालेले असते तालुक्यात मागील वर्षी ११ तर यावर्षी ८ ठिकाणी आग लागली आहे.तालुक्यात आगीच्या वाढत्या आलेखामुळे येथे अग्नीशमन वाहनाची नितात आवश्यकता असल्याचे दिसून येते.परंतु आता शहरामध्ये अग्नीशमन वाहन नगर पंचायतच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येणार किव्हा नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
………………………………………. *या महिन्यात अग्नीशमन वाहन* *मिळण्याची शक्यता*
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतने सोलापूर येथील देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीला अग्नी शमन वाहन बनविण्याचे टेंडर दिलेले आहे ते वाहन बनविण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे त्याकरिता आमचा पाठपुरावा सतत सुरू आहे त्यामुळे नांदगाव खंडेश्वर शहराला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे वाहन मिळण्याची शक्यता आहे

प्रतिक करवा
अभियंता, नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर
……………………………………,…. *जिल्हाधिकारी यांचेकडे केली* *तक्रार*
जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. एड. यशोमती ठाकूर यांच्या आढावा बैठकीत एक महिन्यात नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असतानाही दहा महिन्यांचा कालावधी जाऊनही शहराला अद्यापपर्यंत अग्निशमन वाहन उपलब्ध न झाल्याने आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून एक महिन्याच्या आत अग्निशामन वाहन न आल्यास नगरपंचायतच्या विरोधात आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहे.
फिरोज खान,अहेमद खान.
माजी नगरसेवक,नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर