वाडीपीर सरपंचपदी बिनविरोध शिल्पा टिळके

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.14जून):-ज्योतिबा च्या पायथ्याशी आई महालक्ष्मी च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीतील वाडीपीर गावचे सुपुत्र सागर टेळके यांच्या पत्नी शिल्पा टेळके यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.माजी सरपंच आकाशी लाड यांनी रोटेशन पद्धतीने सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते, यासाठी शिल्पा टेळके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.

ही निवडणूक मंडल अधिकारी प्रवीण माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसरपंच उत्तम शेळके, ग्रामपंचायत सदस्य सागर लाड, शिवाजी रावळ, यशवंत सातपुते, शुभांगी मिठारी, अनिता खोत व सविता टेळके याच बरोबर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांचे आभार ग्रामसेवक निलेश यांनी मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED