चार्वाकवन येथील धम्मसंगितीत साधुमति बलावर चर्चा !

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15जून):-‘ बोधिसत्वाला ‘ अचल बल ‘ प्राप्त झाल्यानंतर साधुमति बलप्राप्तिसाठी सर्व धर्मशास्र आणि प्रणालीत शिरून प्रज्ञेद्वारे आकलन करून घ्यावे लागते आणि सर्व दिशा जिंकाव्या लागतात.म्हणजेच बोधिसत्वास ब्रह्मांडाचे आकलन करून घ्यावे लागते आणि त्यास काळाची सिमा पार करावी लागते, तेव्हाच बोधिसत्वास साधुमति भूभी प्राप्त झाली असे म्हणतात ‘.असे मत धम्मसंगितीत झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आले.ज्येष्ठ पौर्णिमा धम्मसंगितीचे आयोजन दि.१४ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजता चार्वाकवनात करण्यात आले होते.बुद्धवंदनेनंतर धम्मसंगितीचे कामकाज सूरू होण्यापूर्वी प्रा.जनार्धन गजभिये यांनी बुद्धागीत सादर केले आणि प्रथमच संगितीत सहभागी झालेले उपा.पंजाब केशवराव शिंदे आणि उपा.सुनिल हनवते यांचे स्वागत संगितीचे अध्यक्ष मा.मनोहरराव भगत यांनी केले.

उपा.तुकाराम चौरे यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचे बौद्धधम्मातील महत्व विशद केल्यानंतर झालेल्या चर्चेत सर्व उपा.पी.बी.भगत ,डी.जी.पाईकराव,प्रा.टी.बी.कानिंदे,माजी प्राचार्य मा.ल धुळध्वज,अध्यापक प्रकाश कांबळे ,गंगाधरराव कांबळे आणि अॕड.अप्पाराव मैन्द यांनी भाग घेतला.सर्व उपा.यशवंत कांबळे,प्रल्हाद खडसे,गोविंद तलवारे,चंद्रमणी गायकवाड,यशकुमार भरणे,एस डी.भरणे,अनिल डोंगरे,उमाकांत चक्करवार ,चंद्रकांत आठवले,तातेराव मानकर,भागोराव डुदुळे,नारायणराव कराळे,शुद्धोदन पुनवटकर,रमेश सरागे ,सुभाष दायमा,प्रदीप तायडे आणि विश्वजीत भगात हे संगितीत उपस्थित होते.संगितीचे अध्यक्ष उपा.मनोहरराव भगत यांनी समारोपीय भाषण करून धम्मसंगितीच्या मताचा सारांश जाहीर केला. उपस्थिताचे आभार अॕड.अप्पाराव मैन्द यांनी मानले आणि संगितीची सांगता झाली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED