आडनावांच्या आधारे इंपेरिकल डाटा गोळा करणे धोकादायक-आमदार कपिल पाटील

25

🔸सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची केली मागणी

ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आडनावांच्या आधारे ओबीसींचा इंपेरिकल डाटा गोळा करण्याचे समर्पित मागासवर्गीय आयोगाने ठरवले आहे.ओबीसींची यातून घोर फसवणूक होईल.अनेक जाती समुहांमध्ये समान आडनावे आढळतात.त्यामुळे आडनावांच्या आधारे इंपेरिकल डाटा गोळा केल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी यासंबंधीचे पत्र आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.सुप्रीम कोर्टात ओबीसींचे आरक्षण आणखीन अडचणीत येण्याची भिती कपिल पाटील यांनी वर्तवली आहे. ग्रामपंचायत यंत्रणेच्या माध्यमातून डेटा गोळा करणे सहज शक्य असताना आडनावांचा वेळखाऊ आणि फसवा प्रयोग राबवणे म्हणजे ओबीसी आरक्षणाला कायम संकटात लोटल्यासारखे होईल.

ओबीसींच्या इंपेरिकल डेटाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी केल्याची माहिती शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांनी दिली आहे.