विद्याविकास प्राथमिक शाळेत मोफत पाठ्यपुस्तक वाटप व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

✒️धुळे प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

धुळे(दि.15जून):- शहरातील मोगलाई भागातील जगदिश नगर येथील विद्याविकास प्राथमिक शाळेत मोफत पाठ्यपुस्तक वाटप व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जगदीश गायकवाड हे होते. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक तसेच शैक्षणिक साहित्य यांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत शैक्षणिक साहित्य व गणवेश देऊन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत गोड भात देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राहुल गायकवाड यांनी केले कार्यक्रमास शाळेतील शिक्षक कैलास बागुल, गणेश ठाकूर तसेच शिक्षिका सुनिता पाटील, भाग्यश्री पाटील, मुक्ताबाई महाजन ,पद्मिनी चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका वैशाली जगताप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED