पत्रकारांना धमकावत कायद्याला आव्हान देणा-यांवर कठोर कारवाई करा;पोलीस अधिक्षक,गृहमंत्री,विशेष पोलीस महानिरीक्षक यांना तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.15जून);-दैनिक महाराष्ट्र सुर्योदय बीड संपादक अशोक वसंतराव काळकुटे वय २५ वर्षे रा.येळंबघाट ता.जि.बीड यांचा पाठलाग करून अडवुन मौजे.वडगाव ता.जि.बीड येथील जगदंबा कलाकेंद्रातील महिलेवर जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल संबधित आरोपींनी अशोक काळकुटे यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल नेकनुर पोलीस स्टेशनमध्ये एनसीआर दाखल असुन संबधित प्रकरणात कायद्याला आव्हान देणा-या अवैध धंदेवाईकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी गृहमंत्री,पोलीस महासंचालक,विशेष पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक बीड यांना केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव:-
____
अशोक वसंतराव काळकुटे वय २५ वर्षे रा.येळंबघाट ता.जि.बीड व्यवसाय पत्रकारीता संपादक दैनिक महाराष्ट्र सुर्योदय बीड हे ब-याच वर्षापासून प्रामाणिकपणे पत्रकारीतेचे कर्तव्य निभावत असून दि.१३ जुन २०२२ सोमवार रोजी वडगाव येथील कलाकेंद्रावर बळजबरीने वेश्या व्यवसाय;अल्पवयीन मुलीला ठेवले डांबुन “या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यासंदर्भात आरोपी शामिम बानो शहाबोद्दीन शेख,सागर शहाबोद्दीन शेख,समीर अनिस शेख यांनी बातमी लावल्याचा व पोलीस स्टेशन परीसरात छायाचित्रे घेतल्याचा राग मनात धरून सुर्योदय संपादक अशोक काळकुटे यांचा पाठलाग करून नेकनुर येथील बंकटस्वामी काॅलनीत अडवुन शिविगाळ करत अपघात होऊ शकतो म्हणत धमकावले व यापुढे बातमी लावल्यास जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणात अशोक काळकुटे यांच्या तक्रारीवरून नेकनुर पोलीस स्टेशन मध्ये भादंवि कलम ५०४,५०६,३४ प्रमाणे एनसीआर दाखल आहे.संबधित प्रकरणात अवैध व्यवसाय करणारांनी दिवसाढवळ्या पत्रकाराला खुले आम बातमी प्रसिद्ध केल्यास जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजे पोलीस प्रशासनाला आव्हान असुन संबधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED