सातत्याने सभासदाचे हित पाहणारी बँक म्हणजे प्राथमिक शिक्षक बँक- सिद्धेश्वर पुस्तके

43

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.16जून):-प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा शाखा -म्हसवड येथे सेवानिवृत्त सभासद व गुणवत्ताधारक सभासद व सभासद पाल्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना सातत्याने सभासदाचे हित पाहणारी महाराष्ट्रातील एक नंबरची बँक म्हणजे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आहे सत्ताधारी संचालक मंडळाने वेळोवेळी बँकेचे व्याजदर कमी करून सभासदाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले व सभासदाच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या असे गौरवोद्गार अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांनी काढले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हसवड विभागाचे शिक्षक बँकेचे विद्यमान संचालक राजाराम खाडे यांनी केले व बँकेच्या कामकाजाचा गेल्या सात वर्षांतील आढावा सभासदांच्या समोर मांडला.

यावेळी बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी सतत उच्चांकी शेअर्स डिव्हीडंट वाटप करून सभासदाचे हित जोपासले आहे.
खटावचे नायब तहसीलदार रविराज जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये माझ्या शिक्षणामध्ये महत्त्वाचे सहकार्य करणारी बँक म्हणजे प्राथमिक शिक्षक बँक आहे व शिक्षकांनी समाजामध्ये वावरत असताना आपण आपल्या शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल आणि समाजामध्ये आपली मान कशी उंचावेल असे मनोगतामध्ये सभासदांना सुचित केले.शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे यांनी गेल्या सात वर्षांतील बँकेच्या सभासद हिताच्या अनेक निर्णयाचे स्वागत करून बँकेचे कामकाज सिद्धेश्वर पुस्तके व विद्यमान संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

म्हसवड बीटचे सन्माननीय विस्ताराधिकारी लक्ष्‍मण पिसे यांनी आपल्या मनोगतात सभासदांना सभासदांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभागानुसार असावी व बँकेच्या कामकाजाबद्दल उत्कृष्ट असे गौरवोद्गार काढले. केंद्रप्रमुख नारायण आवळे यांनी सर्वसामान्य शिक्षकांनी शिक्षकांना तारणारी अर्थवाहिनी म्हणजे शिक्षक बँक आहे. गेल्या सात वर्षाच्या कालखंडामध्ये संचालक मंडळाने अतिशय चांगला कारभार केला आहे व उच्चांकी डिव्हीडंट वाटप केला आहे असे गौरवोद्गार नारायण आवळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बँकेचे विद्यमान संचालक गटनेते मोहन निकम, शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय छगनराव खाडे, शिक्षक संघाचे सरचिटणीस राजेंद्र बोराटे,शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मोहनराव जाधव (तात्या) शिक्षणविस्तारअधिकारी सन्माननीय संगीता गायकवाड, शिक्षक संघाचे नेते सुभाष शेटे,केंद्रप्रमुख आदरणीय बाळासाहेब पवार, केंद्रप्रमुख अशोक गंबरे,माजी केंद्रप्रमुख अरुण जाधव, शिक्षक संघाचे सरचिटणीस सुरज तुपे, शिक्षक संघाचे नेते सन्माननीय बापूराव जगदाळे ,शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव शिंदे, शिक्षक संघाचे नेते अनंत पोळ, शिक्षक भारतीचे अध्यक्ष सन्माननीय रमेश शिंदे, शिक्षक नेते ह. भ. प .नारायण गंबरे ,शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख हरीश गोरे, शिक्षक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष सन्माननीय मोहनराव जाधव, शिक्षक बँकेच्या माजी संचालिका ताराबाई घोळवे ,शिक्षक नेते पोपटराव जाधव हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाचे सरचिटणीस सुभाष गोंजारी, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुभाष नरळे ,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष महेश माने, शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख जावेद मुल्ला, सन्माननीय शिक्षक नेते दीपककुमार पतंगे, रमेश कापसे, सन्माननीय वैभव पाटील, महिला आघाडीच्या नेत्या अध्यक्ष शिलावती पराडे ,शिक्षक नेते सुधाकर काटकर, महिला आघाडीच्या सरचिटणीस पुष्पा सातपुते, सचिन विरकर, शिक्षक नेते सन्माननीय पोपट बनसोडे ,महिला आघाडीच्या नेत्या रूपाली साखरे, सुजाता गवरे ,परीक्षा मंडळाचे सचिव सुनीलकुमार डोंगरे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक शिवाजीराव शिंगाडे, आदर्श शिक्षक कैलास तोरणे ,आदर्श तंत्रस्नेही शिक्षक किरणजी बोराटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राजाराम तोरणे यांनी मानले.