कोण होती ताजमहालाची महाराणी?

31

[मुमताज महल स्मृतीदिन व ताजमहाल निर्मिती विशेष]

आपल्या अत्यंत प्रीय बेगमच्या मृत्युपश्चात शहांजहाँ शोकसागरात बुडाला होता. असे देखील म्हंटले जाते, की मुमताज बेगमच्या मृत्युनंतर तो तब्बल २ वर्ष शोकमग्न होता. या दरम्यान आपल्या रंगीन आवडी निवडींकरता प्रसिद्ध असलेल्या शहांजहाँने आपल्या आवडी निवडी बाजुला सारल्या होत्या. या काळात त्याने कोणताही शाही लिबास परिधान केला नाही किंवा कोणत्याही शाही कार्यक्रमात उपस्थित देखील राहिला नाही. मुमताज महलच्या मृत्युनंतर शहांजहाँने आपल्या प्रेमाचे अमर प्रतिक म्हणून तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहालाची निर्मीती केली. ताजमहल आपल्या भव्यदिव्यतेमुळे आणि आकर्षक कलाकृतीमुळे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणला जातो. याच्या निर्मीतीकरता तब्बल तेवीस वर्षांचा अवधी लागला. आज भारतीय आणि विदेशी पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण केंद्र ठरले आहे. जरूर वाचा अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दांत हा माहितीपूर्ण लेख… संपादक.

मोगल शासक शहाजहाँची सर्वात आवडती राणी म्हणजे मुमताज महल होय. तीच्या आठवणीत उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बांधण्यात आलेली सुंदर वास्तू आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल या भव्यदिव्य अशा वास्तुरचनेमुळे आजही ती कुण्याच्याही विस्मरणात गेलेली नाही. तिच्या अलौकिक सौंदर्याने शहाजहाँ मोहित झाला नसता, तर नवलच! तिला त्याने आपली सगळ्यात आवडती बेगम म्हणुन दर्जा दिला होता. इतकेच नव्हें तर त्याने अनेक कवींना देखील मुमताजच्या सौंदर्यावर अनेक काव्य लिहीण्याकरता प्रेरित केले होते. मुमताज महल ही अत्यंत करूणा आणि नम्र हृदयाची धनी म्हणून ओळखली जायची. गरजवंतांच्या आणि अनाथ लोकांच्या मदतीकरता ती सतत तत्पर असायची. सौंदर्यसम्राज्ञी तर ती होतीच, त्याशिवाय बुद्धीमान देखील होती. शहाजहाँच्या राज्यकारभाराशी संबंधीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये ती मोलाची मदत करत होती.

इ.स.१५९३ला एप्रील महिन्यात मुमताज महलचा जन्म उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. तिचे मुळनाव अर्जुमंद बानो बेगम असे होते. तिचे वडिल अब्दुल हसन आसफ खाँ हे मोगल साम्राज्यातील चौथे शासक आणि शहाजहाँचे वडिल जहाँगिर यांचे वजिर म्हणून कार्यरत होते. तसेच मुमताज महलची आत्या नुरजहाँ ही मोगल सम्राट जहाँगिर यांची सर्वात प्रिय बेगम होती. मुमताज महल ऊर्फ अर्जुमंद बानो अतिशय सुंदर आणि गुणवान स्त्री होती. ती हरमजवळ असलेल्या मीना बाजारात काचेचे आणि रेशमाचे मोती विकण्याचे काम करत असे. इ.स.१६०७ तीची भेट- खुर्रम याच बाजारात मोगल वंशाचा शहजादा शहाजहाँशी झाली. त्या सुमारास ती केवळ १४ वर्षाची होती. अगदी तेव्हांपासूनच त्यांच्या ऐतिहासिक प्रेमकथेला सुरूवात झाली. हळुहळू त्यांच्या प्रेमाचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले आणि पाच वर्षांनंतर त्यांनी इ.स.१६१२ला निकाह केला. निकाहपश्चात ती शहाजहाँची सर्वात प्रिय आणि आवडती बेगम झाली. तिच्याशिवाय शहाजहाँ एक क्षण देखील राहू शकत नव्हता. मुमताज महलने एकूण १४ अपत्यांना जन्म दिला. ज्यात ८ मुले आणि ६ मुली होत्या. परंतु त्यांची ७ अपत्येच जिवीत राहू शकली. त्यांच्या इतर मुलांचा मृत्यू किशोरावस्थेतच झाला. त्यांच्या अपत्यांमध्ये जहाँआरा बेगम, दाराशिकोह यांचा समावेश आहे.

दाराशिकोह त्यांचा सर्वात सभ्य, समंजस व बुध्दीमान पुत्र होता. यालाच आपल्या मृत्युपश्चात आपला उत्तराधिकारी बनविण्याची शहांजहाँची इच्छा होती. पण पुढे त्याला आपल्या लोभी भाऊ- औरंगजेबासमोर पराजय पत्करावा लागला.अर्जुमंद बानोच्या अलौकिक सौंदर्याने शहाजहाँ एवढा फिदा झाला, की त्याने निकाहानंतर तिचे नाव बदलून मुमताज महल असे केले. याशिवाय त्याने मुमताज महलला मलिका- ए- जमानी ही उपाधी देखील प्रदान केली होती. शहाजहाँच्या मुमताज महल व्यतिरीक्त अनेक बेगम होत्या, परंतु त्याच्या राज्यात जो सन्मान आणि मान मुमताज महलला मिळाला तसा अन्य कुणाला देखील प्राप्त झाला नव्हता. इतिहासकारांच्या मते शहाजहाँने मुमताजला आपल्या राज्यकारभाराशी संबंधीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल केला होता. इतकेच नव्हें तर तिच्या समंतीशिवाय तो कोणतेच फरमान जारी करत नव्हता. त्यांचे उत्कट प्रेम पाहाता, असे देखील म्हंटले गेले, की शहांजहाँला आपल्या बेगमप्रती खुप ओढ आणि प्रेम होते. तो तिच्याशिवाय एक क्षण देखील राहू शकत नव्हता. म्हणून आपल्या राज्यकारभाराशी संबंधीत दौऱ्यांमध्ये सुद्धा तो तिला आपल्या सोबत नेत असे. तसेच आपली सर्वात विश्वासपात्र जोडीदार म्हणून त्याने तिचा गौरव करीत तिच्या सन्मानार्थ आग्रा येथे विशेष महाल, मुहर उजाह, शाही मुहर अशा शब्दांत वाखाणण्याजोग्या भव्यदिव्य महालांची निर्मीती केली होती.

मुमताज महलला आपल्या चौदाव्या अपत्याला- गौहर बेगमला जन्म देतांना प्रचंड प्रसववेदनेला सामोरे जावे लागले आणि त्यातच तिचा दि.१७ जून १६३१ रोजी मृत्यू झाला. आपल्या अत्यंत प्रीय बेगमच्या मृत्युपश्चात शहांजहाँ शोकसागरात बुडाला होता. असे देखील म्हंटले जाते, की मुमताज बेगमच्या मृत्युनंतर तो तब्बल २ वर्षे शोकमग्न होता. या दरम्यान आपल्या रंगीन आवडी निवडींकरता प्रसिद्ध असलेल्या शहांजहाँने आपल्या आवडी निवडी बाजूला सारल्या होत्या. या काळात त्याने कोणताही शाही लिबास परिधान केला नाही किं कोणत्याही शाही कार्यक्रमात उपस्थित देखील राहिला नाही. मुमताज महलच्या मृत्युनंतर शहांजहाँने आपल्या प्रेमाचे अमर प्रतिक म्हणून तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहालाची निर्मीती केली. ताजमहल आपल्या भव्यदिव्यतेमुळे आणि आकर्शक कलाकृतीमुळे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणला जातो. याच्या निर्मीतीकरता तब्बल तेवीस वर्षांचा अवधी लागला. आज भारतिय आणि विदेशी पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण केंद्र ठरले आहे. ताजमहाल हा मुमताज महलची अत्यंत भव्य आणि आकर्षक कब्र आहे. त्यामुळे या इमारतीला मुमताजचा मकबरा देखील म्हटल्या जाते. या शिवाय ताजमहल हे शहांजहाँ आणि मुमताज महल यांच्या अद्वितीय प्रेमाचे प्रतिक म्हणून देखील प्रसिध्द आहे.

!! पुरोगामी न्युज नेटवर्क परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांच्या अजरामर प्रेमाला विनम्र अभिवादन !!

✒️अलककार:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी[म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी]गडचिरोली, भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.