पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचा ८५ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न….

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.17जून):-भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जिल्हा शाखा गडचिरोली च्या विद्यमाने थोर समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे(राळेगण सिध्दी) यांचा ८५ वा वाढदिवस अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत साधेपणाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा होते. प्रमुख अतिथी म्हणून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे राज्य समितीचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, पंडित पुडके, अरविंद पाटील वासेकर, जिल्हा प्रमुख विजय खरवडे, प्राचार्य भाऊ पत्रे, प्रा. भास्कर नरूले, दलितमित्र नानाजी वाढई, प्रा. श्रीकांत कुत्तरमारे, मनोहर हेपट,प्रा. विलास पारखी , सुखदेव वेठे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक विजय खरवडे यांनी करून अण्णासाहेब हजारे यांच्या आजवरच्या संघर्षपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला. उद्घाटक कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले की, अण्णासाहेब हजारे यांनी मोठ्या संघर्षातून आपल्याला माहितीचा अधिकार मिळवून दिलेला आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी हा अधिकार म्हणजे म्लृृ प्रभावी शस्त्र आहे. या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आपण योगदान दिले पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ.देवाजी तोफा म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना महात्मा गांधी स्वप्न काय होते, याकडे लक्ष द्यावे लागेल. ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे , असे ते म्हणाले. डॉ. कुंभारे म्हणाले की, प्रत्येकांच्या हाताला काम आणि भाकरीचा प्रश्न खेड्यातच सुटला तर शहरं फुगणार नाही. खेडी स्वयंपूर्ण व व्यसनमुक्त करा हा अण्णांचा विचार गावागावात पोहचविणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्री वृद्धाश्रमात फळवाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले. गरीब मुलींना वस्त्रदान , महिलांना धान्य वितरण करण्यात आले. सायकल स्नेही मंडळाचे वतीने देण्यात येणारा वार्षिक सायकल स्नेही पुरस्कार सिआरपीएफ असिस्टंट कमांडंट डॉ. चेतन शेलोटकर आणि विलास निबोंरकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन पंडित पुडके यांनी केले. आभार तुषार निकुरे यांनी मानले. कार्यक्रमास सुरेश मांडवगडे, मधुकर भोयर, घनश्याम जेंगठे, किशोर खोब्रागडे, मारोती उईके, आत्माराम आंबोरकर ,ज्योती कोमलवार, फुलचंद वाघाडे , धनपाल कार आदी गुरुदेव प्रेमी , भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.