28 वर्षानंतर शिक्षक आले एकत्र (स्नेहमीलन सोहळा कार्यक्रम)

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.17जून):-स्थानिक बॅ.राजाभाऊ खोब्रागडे डी. एड. कॉलेज ब्रम्हपुरी येथील सन 1993- 1994 मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात 28 वर्षानंतर घोडाझरी पर्यटन स्थळ नागभिड येथे संपन्न झाला.यामध्ये 20 विद्यार्थ्यांच सहभाग होता.28 वर्षापूर्वी शिक्षक पात्रता अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हे सर्वजण आजतागायत आपआपल्या ठिकाणी आपल्या हुद्यावर कार्यरत होते. यशवंतराव शिंदे विद्यालय भद्रावती येथील शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. ए.एम.देशमुख सरांनी एकूण 30 वर्ग मित्राची जुळवाजुळव करून हा स्नेहमिलन सोहळा घडवून आणला.

यात मोलाचे सहकार्य लाभलं ते म्हणजे श्री. संजय जी. पुरी गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी, श्री.राजू कोर प्राचार्य आकाश विद्यालय मेंढा (कि.) ता.नागभीड,प्राध्यापक डॉ. संजय तावाडे भवभुती महाविद्यालय आमगाव जि. गोंदिया, प्रगतिशील उद्योजक श्री.यशवंत बनपूरकर पटेल नगर ब्रह्मपुरी,श्री.ताराचंद राऊत महसूल विभाग साहेब तहसील कार्यालय ब्रह्मपुरी इत्यादीचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सुरुवात विश्राम गृह ब्रम्हपुरी येथे एकत्रित येऊन झाली. या ठिकाणी एकमेकांना परिचय देवुन जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला.

त्यानंतर खोब्रागडे अध्यापक विद्यालयाला भेट देऊन थेट घोडाझरी पर्यटन स्थळाला भेट दिली. विचारांची देवाण-घेवाण करीत करीत 28 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये केलेल्या गंमती जमतीत रममान झाले. प्रत्येकाचे मनोगत झाल्यानंतर स्वरूची भोजनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला सर्वजण निघाले.या सोहळ्याला राघोर्ते सर, सोनटक्के सर, लोणारे सर, पाटणकर मॅडम, गजभिये मॅडम, सुनिता पत्रे मॅडम,राऊत सर, मुख्याध्यापक निखाडे सर, प्राध्यापक कुंभारे, प्रकाश डोंगरवार,उद्धव देशमुख सर
आवर्जून उपस्थित होते.