विवरे येथील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

🔹विवरे गावाच्या परिसरात ६०० वृक्षांचे वृक्षारोपण !….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.17जुन):-धरणगाव तालुक्यातील विवरे गावात वटपौर्णमेच्या दिवशी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. तो असा दरवर्षी गावातील सर्व महिला परंपरेप्रमाणे वटवृक्षाला धागे बांधून पतिव्रतेचे वचन देतात. पण या बदलत्या काळात पर्यावरणाचे देखील रक्षणाचे वचन प्रत्येकाने करावे. म्हणुनी गटातील सर्व महिला प्रत्येकी एक वटवृक्ष लावून आणि त्याचे संरक्षण करून घेऊया असा निर्धार केला.कोरोना काळात ऑक्सिजन विना अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. वडाला फेर्‍या मारण्यापेक्षा आपण आपल्या गावात झाडे लावू व ती जगवुया जेणेकरून आपलं गाव हिरवेगार होईल असा एक नवीन संकल्प गावातील महिलांनी केला.

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें। पक्षी ही सुस्वरें आळविती या संकल्पनेचा आधार घेऊन विवरे गावाच्या गावठाण परिसरात अंदाजे ६०० विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले.विशेष म्हणजे गावातील स्वामी समर्थ गटातील सदस्य भिकुबाई संतोष माळी यांनी स्वखर्चाने ५०० वृक्ष रोप देण्याचे प्रतिपादन दिले. या निमित्त विवरे गावातील सर्व महिला बचत गटातील महिला तसेच CRP सौ.जयश्री गणेश पाटील कृषिसखी सौ.रंजना पाटील गावातील. सर्व तरुण वर्ग यांचे ही मोलाचे योगदान लाभले. विवरे गावातील महिलांनी इतरांसाठी एक आदर्श निर्माण करून दिला. महिलांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED