सुवर्णमहोत्सवी शाळेचा एस.एस.सी परीक्षेचा निकाल १०० %

🔹 रोहन गजरे प्रथम, द्वितीय राज पटुणे, तृतीय कु. मयुरी पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.17जून):- येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगांव शाळेचा सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला.रोहन सुनिल गजरे शाळेतून ९१ % गुण संपादन करून प्रथम आला. द्वितीय क्रमांकाने राज मनोज पटुणे ८९.४० % तर तृतीय क्रमांकाने कु. मयुरी साहेबराव पाटील ८७.८० % मिळवुन यश संपादन केले. विशेष प्राविण्यसह २४ मुले, प्रथम श्रेणीत १५ मुले, द्वितीय श्रेणीत ४ मुले. असे ४३ पैकी ४३ मुले पास होऊन शाळेचा १०० % निकाल लागलेला आहे.

विद्यार्थ्यांनी शाळेच्या शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.याप्रसंगी सुवर्ण महोत्सवी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के.कापडणे, इ.१० वी चे वर्गशिक्षक पी.डी.पाटील, एस.व्ही.आढावे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED