जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व जेष्ठ नागरिक भा. ग .मोरेचा वाढदिवस इश्रम कार्ड वाटप व विविध उपक्रमांनी साजरा

28

✒️नायगांव,प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.17जून):-जेष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त नायगांव येथे दि. १५ जून रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण रुग्णालय नायगांव (बा. ) येथे रुग्णालयात दि. १५ नायगांव शहरातील विविध शाळा व शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात वृक्ष संगोपनाची हमी घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.व नायगाव शहरातील बांधकाम व्यवसायिक यांना इश्रम कार्ड काढण्याचा शुभारंभ जेष्ठ बांधकाम व्यवसायिक राम मिस्त्री व किशन मिस्त्री यांचा सत्कार करून करण्यात आला.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन (न्यास) नायगांवचे तालुकाध्यक्ष माधव मामा कोकुरले यांच्याकडून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघाचे ता अध्यक्ष तथा आणाच्या विचाराने प्रेरित असलेले मजविप ता सचिव भा.ग.मोरे यांच्या अमृत म्होस्तवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, त्यांच्यासह भ्रष्टाचार जनआंदोलन न्यास समिती नायगावचे ता.अध्यक्ष माधव मामा कोकुरले,जेष्ठ पत्रकार एस.एम. मुदखेडकर,ता.मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष नागेश कल्याण,ता. कार्याध्यक्ष माधव धडेकर,मनोज सावकार आरगुलवार,प्रा मोरे,दिनेश मोरे,राम मिस्त्री,किशन मिस्त्री यांची उपस्थिती होती. या सह अधिकारी-कर्मचारी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.