चकलांबा येथील प्रियंका सांगळेंनी दहावीत 94.20 टक्के गुण मिळवून शाळेतून उल्लेखनीय गुणवत्ता मिळवून पटकावला दुसरा नंबर

96

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.18जून):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दि,17 जून रोजी जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय चकलांबा येथे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील एका शेतकऱ्याच्या मुलीने केली आहे. प्रियंका विजय सांगळे असं दहावीत 94.20 गुण मिळवलेल्या मुलीचं नाव आहे.

तिने दिवस-रात्र अभ्यास करून आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचंय. इयत्ता दहावीत शिकत असताना आईने प्रियंकाला घरातील कामं सांगितली नाहीत. फक्त तिचे लक्ष अभ्यास करण्यात असायचे त्यामुळे तिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेत दुसरा नंबर गाजवला आहे. प्रियंकाला घरातील व्यक्तींनी मार्गदर्शक करून त्यानुसार ती अभ्यास करायची, अभ्यास व सराव प्रियंकाने खूप केले होते. त्यामुळे तिने परीक्षेचे टेन्शन घेतले नाही, प्रियंका पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय चकलांबा येथे शिक्षण पूर्ण केले आहे.

गेली कित्येक वर्ष मेहनतीच्या बळावर संसाराचा गाडा यशस्वीपणे सांगळे कुटुंब हाकत आहेत. प्रियंकांने कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट धरला नाही, तिच्या आई वडिलांनीही शिक्षणाच्या बाबतीत तिला काही कमी पडू दिलं नाही. सकाळी साडेचारला उठणे आणि अभ्यास करणे तसेच तिने क्लासेस लावले होते. क्लासेसला जाऊन पुन्हा घरी आल्यानंतर अभ्यास करणे असा तिचा दिनक्रम असायचा. प्रियंकाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असून नामवंत डॉक्टर व्हायचं आहे, असे प्रियकांचे स्वप्न आहे. शिक्षणात आर्थिक अडचणी आल्या तरी मुलींना शिकलं पाहिजे असं तिच्या कुटुंबियांची जिद्द आहे.प्रियंका सांगळे च्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, पत्रकार, नातेवाईक तसेच गावकऱ्यांनी अभिनंदन केले.