प्रदूषण मुक्तीच्या मार्गावर घुग्घुस.. प्रशासन नमले… आम आदमी जिंकले……

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.18जून):-आम आदमी पार्टीच्या उपोषणाला आखिर कार अकराव्या दिवशी यश मिळाले. आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारा मागील कित्तेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस बाजूचा मार्गावरून जड वाहनांची अवैध्य रित्या केली जात होती या विरोधात मागील कित्तेक महिण्यान पासून सतत लढा देत होती परंतु याकडे प्रशासना द्वारे दुर्लक्ष केल्या जात होते.हे सर्व लक्षात घेता आम आदमी पार्टी 07 जून 2022 रोजी साखळी अन्नत्याग उपोषण करण्यात आले व हे उपोषण सतत 11 दिवस चालल्या नंतर उपोषणाच्या 10 व्या दिवशी चंद्रपूर चे तहसीलदार यांच्या मार्फत 16 जून 2022 रोजी बैठक घेण्यात आली.

या बैठकी मध्ये चंद्रपूर चे तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस स्टेशन घुग्घुस चे ठाणेदार, लॉईडस मेटल कंपनीचे अधिकारी व आम आदमी पार्टी चंद्रपूर व घुग्घुस च्या संपूर्ण टीम सामोर ही बैठक घेण्यात आली व या बैठकी नंतर उपोषणाच्या 11 व्या दिवशी तहसीलदार साहेब यांनी लेखी स्वरूपामध्ये पत्र दिले व उपोषणा वर बसलेले आम आदमी पार्टी घुग्घुस शहर सह संघटनमंत्री आशिष पाझारे यांना शरबत पाजुन या उपोषणाची सांगता करण्यात आली व येत्या 10 दिवसा मध्ये आम आदमी पार्टी द्वारा करण्यात आलेल्या मागण्या…01) सध्या जड वाहतुकीस वापरत असलेला अवैध्य मार्ग त्वरित बंद करावा. (02) प्राथमिक आरोग्य केंद्रा बाजूला असलेले नियमबाह्य जड वाहनांची पार्किंग तात्काळ बंद करावी. (03) जड वाहतुकी साठी नियमा नुसार शासनाने दिलेला कंपनीने पाठीमागच्या मार्गाचा वापर करावा…या प्रमुख मागण्या होत्या व या मागण्या मान्य करण्यात आल्या असून येत्या 10 दिवसांमध्ये या सर्व मागण्या पूर्ण करू असे लेखी स्वरूपामध्ये आश्वासन देण्यात आले.

यावर बोलताना आम आदमी पार्टी घुग्घुस चे शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी सांगितले की येत्या 10 दिवसांमध्ये या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 11 व्या दिवशी पासून आम आदमी पार्टी द्वारा आमरण उपोषण करण्यात येईल असे आश्वासन दिले व सोबतच लॉईडस मेटल & एनर्जी लिमिटेड कंपनी मध्ये सुरजागढ वरून येणारा आयरण स्पंज हा ओव्हरलोड येत असल्यामुळे यावर कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या द्वारा देण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखांडे, जिल्हा युवा अध्यक्ष मयुर राईकवार,चंद्रपूर महिला शहर अध्यक्ष ऍड. सुनीता पाटील शहर अध्यक्ष अमित बोरकर,भद्रावती शहर सचिव सुमित हस्तक, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई,रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED