मनोहरराव नाईक उर्दू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

🔸विद्यालयातुन मुलीच अव्वल

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)

मुळावा(दि.18जून):-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल नुकताच लागला असून मनोहरराव नाईक उर्दू हायस्कूल मुळावाचा निकाल 100 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असुन विद्यालयातुन अव्वल येत मुलींनी बाजी मारली आहे विद्यालयातून अलवीना खानम नासेर खान हिने 88.80 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

फिरदौस अंजुम नदीम अहमद 85.20 टक्के सह द्वितीय तर जेबा परवीन शेख मौला व बुशरा अंजुम जफर मोहम्मद खान 84.80 टक्के मिळवित अनुक्रमे तृतीय क्रमांक पटकाविले असून सकाविया कौसर शेख कय्युम 84.60 टक्के घेत चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. संस्था अध्यक्ष सय्यद मंजूर सैय्यद मुसा, उपाध्यक्ष सै. मन्नान सय्यद करीम, सचिव शे.इब्राहिम शे.इस्माईल ,मुख्याध्यापक मुख्तार खान जलील खान सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व आईवडिलांना दिले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED