🔺राज्यातील ई-महासेवा केंद्र सुरू करा-सुशांत गोरवे🔺

16

🔺नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक आघाडीने सादर केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बारामती(दि-30जून)नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी महाराष्ट्र राज्यातील ई-महासेवा केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविले आहे.लाँकडाऊनच्या काळामध्ये सर्व कंपन्या, दुकाने, बाजारपेठ, सर्व काही बंद होत, ज्या ज्या ठिकाणी रेड झोन आहे, त्या त्या ठिकाणी अजूनही बंदच आहेत,पण रेड झोन वगळता जिथे जिथे ग्रीन झोन आहे तिथे ईमहासेवा केंद्र चालू करायला काय हरकत आहे, रेड झोन वगळून सरकारने राज्यामधील जे जे आँनलाईन कामकाज आहे ते पुर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी,, प्रत्येक गोष्ट आँनलाईन झाल्यामुळे गोरगरिब जनतेचे हाल होऊ लागले आहेत,हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे, सोशल डिसंन्ट्स ठेवून कार्यपद्धती चालू करावी, काही सुविधा चालू आहेत परंतु *आधारकार्ड, मतदान, कार्ड* या प्रमुख सारख्या गोष्टी ज्या आहेत वेळोवेळी लागणार्या याच बंद आहेत, त्यामुळे सर्व सामान्य जनतेचा हा प्रमुख घटक आहे,,
सरकारने लवकरात लवकर या आँनलाईन ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्या चालू कराव्यात अशी मागणी मा.सुशांतभाऊ गोरवे यांनी मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांना केली आहे .