योग महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19जून):-दिनांक 21 जून 2022 रोजी शहरातील कापसे गार्डन मंगल कार्यालय, परळी रोड या ठिकाणी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. यामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे हा योग दिनाचा कार्यक्रम असंख्य योग प्रेमींच्या सानिध्यात संपन्न होणार आहे.

योग शिबिराची वेळ सकाळी 6 ते 8 अशी असणार आहे. योग साधकांनी शक्य असल्यास पांढऱ्या ड्रेस मध्ये यावे व सोबत पाण्याची बॉटल ठेवावी. तरी या एक दिवसीय योग महोत्सवांमध्ये शहरातील सर्व योग साधक, योग प्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व पतंजली योग समिती गंगाखेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED