


🔸सामाजिक कार्यकर्ते गौरव पाटील, निखिल डोईजड, बंटी शिंदे, स्नेहल शंभरकर, व समस्त पिंपळनेरी वासी यांची मागणी
🔹नगरपरिषद मुख्याधिकारी, चिमुर, निवेदन
✒️सुयोग सुरेश डांगे(तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.20जून):-नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या पिंपळनेरी प्रभाग क्रमांक २ मध्ये असलेल्या स्मशानभूमीच्या परिसरात शेड, संरक्षण भिंत, सौन्दर्यीकरणं करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गौरव पाटील, निखिल डोईजड, बंटी शिंदे, स्नेहल शंभरकर यांनी चिमूर, नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना केली. सविनय विनंती या प्रमाणे आहे की सन 1975-76 साला पासुन पिंपळनेरी येथील रहिवासी वास्तव्यास राहत आहेत.
शासनाने 1976 मध्ये स्मशान भुमी करिता ती जागा उपलब्ध करून दिली होती. तेव्हा पासुन त्या ठिकाणावर आज पर्यंत मृतांना जाळण्या करिता कोणत्याही प्रकारचे शासकीय शेड, रस्ता, संरक्षण भिंत, विसाव्या करिता कोणत्याही सोयी सुविधा नाही, बसण्यास ओठे, पाण्याची सुविधा नाही, त्यामुळे आम्हाला ऊन वारा पाऊस थंडी यांचा वारंवार अतीत्रास सहन करावा लागत आहे, रात्रीला काही विषारी प्राण्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. अशी मागणी नगरपरिषद चिमूर चे मुख्याधिकारी यांना केली आह




