सनरेज इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यानी मिळविले घवघवित यश

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.20जून):-नजरा एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित सनरेज इंग्लिश मीडियम स्कूलचा दरवर्षी प्रमाने या वर्षीही निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे . गणेश रमेश पोटे याने 93.40% गुण प्राप्त करुण शाळेतुन प्रथम क्रमांक पटकावला.

विशेष म्हणजे हा विद्यार्थी दररोज बाळदी वरुन नियमित शाळेत येत असे. त्याचबरोबर अरमान मोईज खान याने 92.80% गुण प्राप्त करुण द्वीतीय क्रमांक पटकावला तर ऋषिकेश मारोती कोकाटे आणि आदेश बालाजी कदम याने संयुक्त रित्या तृतीय क्रमांक पटकावला.

शाळेतील एकुण 32 विद्याथ्या पैकी 30 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत व 02 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत.

अब्दुर रहेमान शेख वसिम अहेमद या विद्यार्थ्याने गणित या विषयात 100 पैकी 99 गुण घेऊन गणित या विषयात शाळेतुन पहिला क्रमांक पटकावला.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शाळेचे अध्यक्ष अॅड वसिम अहेमद उपाध्यक्ष अविनाश पोंगाने सल्लागार समितीचे सदस्य श्री राम बोकन, श्री भगवान गायकवाड, प्रवीण सूर्यवंशी, सौ. सरोज मांडवगडे, सय्यद कय्यूम शाळेच्या व्यवस्थापिका सौ. उमा पराग शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गोरे सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच निकालाची परंपरा अशीच कायम रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED