अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते – प्रा. डॉ.रवींद्र विखार

43

🔹दुसऱ्यांदा देशसेवेसाठी निवड झालेले रेवनाथजी ठाकरे व व मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले मा. श्री ए. एम. ठाकरे सर यांचा इन्स्पायर करिअर अकॅडमी तर्फे सत्कार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.20जून):-अपयश म्हणजे शेवट नसून यशाची सुरुवात आहे प्रयत्न करीत राहिल्यास एक ना एक दिवस यश नक्की मिळते असे प्रतिपादन प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी केले ते इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रह्मपुरी द्वारा आयोजित एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न करत यशाला गवसणी घालावी अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून प्रामाणिकपणे जिद्द व चिकाटीने यश खेचून आणावे हे विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले की इतर लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून आपण आपले ध्येय ठरवून यशाकडे वाटचाल करावी.स्पर्धा परीक्षेची सुरुवात अगदी बालपणापासूनच होत असते आपण इतर गोष्टींचा बाऊ न करता अभ्यास करत राहिला यश मिळाल्याशिवाय राहत नाही असे त्यांनी सांगितले .

आपल्या मार्गदर्शन त्यांनी स्वतःचा जीवन प्रवासही उलगडून दाखवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए एम ठाकरे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक निरुपा विद्यालय रुई हे होते .तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉक्टर रवींद्र विखार ,श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा , मा. श्री मनोहर आंबोरकर सर , दिपकजी सेमस्कर सर हे होते .प्रमुख अतिथी म्हणून श्री गोवर्धनी दोनाडकर ब्रम्हपुरी शहर प्रतिनिधी देशोन्नती ,श्री कोरवते सर ब्रह्मपुरी, इन्स्पायर अकॅडमी चे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम, अकॅडमी चे मार्गदर्शक प्रा नवनाथ सूर्यवंशी सर ,प्रा.खरवडे सर प्रा. दीपा मेश्राम , गीतेश किसान सर , महेश पिलारे कार्यकारी संपादक ब्रह्मपुरी समाचार हे उपस्थित होते. मा मनोर आंबोरकार सर यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश कसे मिळवायचे यासाठी कोणत्या प्रकारचे नियोजन करावे लागते कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावी लागतात याचे सखोल मार्गदर्शन केले .स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते असेही ते म्हणाले .

त्याचप्रमाणे कोरवाते सर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती दिली.मा श्री गोवर्धनजी दोनाडकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुठलीही कमतरता नसून ते सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतात त्यासाठी प्रामाणिकपणा जिद्द व चिकाटी आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेच्या विश्वात केवळ तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात इन्स्पायर अकॅडमी ने नावलौकिक मिळवलं आहे असे गौरवोद्गारही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्री ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवून यश मिळवता येते असे प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वतःच्या करिअर घडवून स्वतःचं, आई-वडिलांचा तसेच इन्स्पायर अकॅडमी चा मान वाढवावा असे विचार त्यांनी मांडले.

या कार्यक्रमाप्रसंगी इन्स्पायर अकॅडमी च्या शासकीय नौकारीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला यामध्ये रेवनाथ ठाकरे यांची एस आर पी एफ मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सोबतच पपीता खोब्रागडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला, दहावीच्या परीक्षेमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा याप्रसंगी करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्पायर करिअर अकॅडमी चे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन सपना दोनाडकर तर आभार प्रदर्शन इन्स्पायर अकॅडमी चे मार्गदर्शक प्रा नवनाथ सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम राठी ,मयुरी सहारे, प्रीती पिलारे ,प्राची रामटेके, वैभव आत्राम, अनिल प्रधान ,पंकज गेडाम , हेमंत मस्के इत्यादींनी सहकार्य केले,कार्यक्रमाला बहुसंख्य विध्यार्थी उपस्थित होते.