आधार प्रतिष्ठान च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

28

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.20जून):; म्होप्रे तालुका कराड येथील आधार प्रतिष्ठान च्या वतीने इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार प्रतिष्ठान च्या वतीने शालेय साहित्याचे वाटप कराड पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मण जाधव आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच राहुल संकपाळ, म्होप्रे विकास सेवा सोसायटीचे संचालक धोंडीराम साठे, उमेश यादव(सर), राष्ट्रीय काँग्रेस कराड दक्षिण ओबीसी सेलचे अध्यक्ष सागर जाधव, संदीप संकपाळ(संजू शेठ), विक्रम साचे,किशोर साठे,सचिन साठे,गणेश चव्हाण, महेश डुबल राजरत्न कांबळे, सागर कुंभार, प्रकाश कांबळे यांची सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक उमेश यादव (सर) यांनी केले तर आभार किशोर साठे यांनी मानले.